नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून आयपीएल सुरु होत आहे. आयपीएल म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक मनोरंजनाचा खजिनाच. आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूने धडाकेबाज बॅटिंग करावी अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींची असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही खेळाडूंनी आपली ओळखच 'सिक्सर किंग'च्या रुपात केली आहे. यामध्ये ख्रिस गेल, एबी डिविलियर्स, युवराज सिंग यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र, क्रिकेटविश्वात असेही काही बॅट्समन आहेत ज्यांनी आपल्या पूर्ण वन-डे करिअरमध्ये एकही सिक्सर लगावला नाहीये.


बॅटिंगमध्ये अव्वल मात्र...


असेही काही बॅट्समन आहेत ज्यांचं नाव ओपनर बॅट्समनमध्ये अव्वल आहे आणि त्यांनी रन्सही चांगले बनवले आहेत. मात्र, सिक्सर मारण्याच्या बाबतीत मागे आहेत. आज आम्ही टीम इंडियाच्या अशाच एका ओपनर बॅट्समन संदर्भात तुम्हाला सांगणार आहोत. या क्रिकेटरने १३० वन-डे मॅचेस खेळल्या मात्र, एकही सिक्सर लगावला नाही.


एकही सिक्सर लगावला नाही


सर्वात आधी टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन मनोज प्रभाकर याच्याविषयी बोलूया. मनोज प्रभाकर ऑलराऊंडर होते. त्यांनी १९८४ ते १९९६ या दरम्यान क्रिकेट खेळलं. प्रभाकर यांनी आपल्या वन-डे क्रिकेट करिअरमध्ये १३० मॅचेस खेळल्या आणि १८५८ रन्सही बनवले यामध्ये २ सेंच्युरी आणि ११ हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. 


बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी करत असतानाही प्रभाकर यांनी एकही सिक्सर लगावला नाही. टेस्ट करिअरचं बोलायचं झालं तर त्यांनी ३९ टेस्ट मॅचेसमध्ये ३३ च्या सरासरीने १६०० रन्स बनवले ज्यामध्ये एक सेंच्युरी आणि ११ हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. टेस्टमध्ये त्यांनी ४ सिक्सर लगावले आहेत.