Faf du Plessis: यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीच्या टीमची सुरुवात काही फारशी चांगली झाल्याचं दिसून येतं नाहीये. मंगळवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सने आरसीबीचा 28 रन्सने पराभव केला. आरसीबी 4 सामन्यांपैकी 3 सामने हरली असून आरसीबीने पुन्हा एकदा होम ग्राऊंडमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. घरच्या मैदानावर 2 सामने हरणारी आणि ऑलआऊट होणारी RCB हा सिझनमधील पहिली टीम ठरलीये. या पराभवामुळे संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस निराश दिसून आला.


पराभवानंतर काय म्हणाला Faf du Plessis?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊकडून झालेल्या पराभवानंतर फाफ निराश दिसून आला. यावेळी तो म्हणाला, सामन्यादरम्यान कॅच सोडणं आम्हाला भारी पडलं. आम्ही डी कॉक आणि निकोलस पूरनचे कॅच सोडले. याचा परिणाम लखनऊने 60 ते 65 रन्स जास्त केले. हीच गोष्ट आम्हाला महागात पडली. मयंक अगदी नवीन आहे आणि आम्ही त्याला खेळलो नाही, त्यामुळे त्याला समजून घ्यायला थोडा वेळ लागेल. पण मयंकने ज्या पद्धतीने बॉलवर नियंत्रण ठेवलं ते कौतुकास्पद आहे. पॉवर प्लेमध्ये आमची गोलंदाजी खराब होती आणि आम्ही फलंदाजीतही चांगली कामगिरी करू शकलो नाही.


सामन्यात पुढे जाण्यासाठी, दोन फलंदाजांची उत्तम पार्टनरशिप होणं महत्त्वाचं होतं. परंतु आम्ही ते करू शकलो नाही. पाटीदार आणि रावत यांनी भागीदारी केली पण लखनऊच्या टीमसाठी फारशी अडचणीची ठरली नाही. महिपालची चांगली फलंदाजी झाली. मात्र विकेट पडल्यानंतर आमचा पराभव निश्चित होता, असंही फाफने स्पष्ट केलं.


कर्णधार आणि फलंदाज म्हणून फ्लॉप ठरला फाफ


आयपीएल 2024 मधील फाफ डू प्लेसिसची वैयक्तिक कामगिरी देखील खूपच निराशाजनक दिसून आली. आरसीबीचे 4 सामने झाली असून फाफने यंदा चांगली फलंदाजी केलेली नाही. गेल्या 4 सामन्यांमध्ये फाफने CSK विरुद्ध 35 रन्स, पंजाब किंग्ज विरुद्ध 3, KKR विरुद्ध 8 रन्स केले आणि या सामन्यातही तो 19 रन्स करून बाद झाला. 


आरसीबीचा 28 रन्सने पराभव


आयपीएल 2024 च्या 15 व्या सामन्यात बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्स आमनेसामने आले होते. या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स टीमने टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स 181 रन्स केले होते. या सामन्यात लखनऊने मयंक यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर आसीबीचा 28 रन्सची पराभव केला.