वडिलांच्या निधनानं गहिवरलेला भारतीय गोलंदाज म्हणतो...
वडिलांचं निधन होऊनही त्यानं....
मुंबई : भारत India विरुद्ध Australia ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेसाठी संघ परदेशी रवाना झालेला असतानाच भारतीय संघातील एका क्रिकेटपटूवर दु:खाचा डोंगर कोसळला. जीवनात प्रत्येक क्षणाला पाठिंबा देणाऱ्या वडिलांच्या निधनानं वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला हादरा बसला. पण, यातूनही सावरत आता सिराजनं पुन्हा एकदा त्याच्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे.
शुक्रवारीच वडिलांचं निधन होऊनही संघासोबत ऑस्ट्रेलियातच राहण्याचा निर्णय़ मोहम्मद सिराजनं घेतला. बीसीसीआयनं त्याला परत येण्याची मुभा दिलेली असतानाही त्यानं संघासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. 27 नोव्हेंबरपासून संघ 54 दिवसीय सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांच्या सत्राची सुरुवात करणार आहे.
जीवनात आलेल्या याच वळणाविषयी बीसीसीआय टीव्हीशी संवाद साधत असताना सिराज म्हणाला, 'माझ्यासाठी त्यांचं जाणं मोठा धक्काच. कारण, तेच माझा सर्वात मोठा आधार होते. देशासाठी मी खेळावं आणि देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी हे माझ्या वडिलांचं स्वप्नट होतं. आता मला जर काही करायचं असेल तर, माझ्या वडिलांचं तेच स्वप्न पूर्णत्वास न्यायचं आहे'.
वडील सध्या या जगात नसले, तरीही ते माझ्या मनात मात्र कायम असतील असं म्हणत आपण आईशी संवाद साधल्याचं सिराजनं सांगितलं. इतकंच नव्हे, तर आईनंच त्यांच्या या स्वप्नाची आठवण आल्याला करुन देत भारतीय संघासाठी खेळत चांगली कामगिरी करण्याचं प्रोत्साहन दिलं असं तो म्हणाला.