ढाका : पाकिस्तान आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. पाकिस्तानने चार विकेट गमावत 300 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. तर बांगलादेशची सात विकेटवर 76 धावा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे बांगलादेशवर फॉलोअनची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशच्या सात विकेटपैकी सहा विकेट पाकिस्तानाच फिरकी गोलंदाज साजिद खानने घेतल्या. साजिदने 12 षटकात 35 धावा देत सहा विकेट घेतल्या. विकेट घेतल्यानंतर साजिदने जल्लोष केला. पण यावरुनच सध्या तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.


साजिदकडून शिखर धवनची नक्कल
साजिद खान विकेट घेतल्यानंतर टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनच्या स्टाईलची नक्कल करताना दिसला. एखादा कॅच किंवा रनआऊट केल्यानंतर शिखर धवन कबड्डी स्टाईलने आनंद व्यक्त करतो. शिखरची ही अनोखी स्टाईल क्रिकेट प्रेमींच्याही चांगली पसंतीस उतरली आहे. क्रिकेट चाहत्यांच्या मते शिखर धवनची ही 'ट्रेडमार्क स्टाईल' आहे. 



त्यामुळे शिखर धवनची ट्रेडमार्क स्टाईलची नक्कल करणारा साजिदला सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे.


सोशल मीडियावर यूजर्सने म्हटलं आह, पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंची नक्कल करण्याऐवजी स्वत:ची स्टाईल शोधायला हवी. राहुल नावाच्या एका युजरने लिहिलंय, विराट कोहलीची स्टाईल चोरणाऱ्या बाबर आझमनंतर आता स्वस्तातला धवनही पाहायला मिळत आहे.



रेयान एटवूड या युजरने लिहिलंय कदाचित साजिद धवनचा फॅन असेल. अनेक पाकिस्तानी खेळाडू भारतीय खेळाडूंना फॉलो करतात. सुंदरेसन या युजरने लिहिलंय, भारतीय खेळाडू नेहमीच ट्रेंड सेट करतात. रोहित शर्मा 45 नंबरची जर्सी घालतो, आता पाकिस्तानचा आसिफ अलीही 45 नंबरची जर्सी परिधान करु लागला आहे.