इस्लामाबाद : ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) काही दिवसांपूर्वी विजय हजारे करंडकात (Vijay Hazare Trophy) एकाच ओव्हरमध्ये तब्बल 7 सिक्स खेचण्याचा पराक्रम केला. यानंतर आता अवघ्या काही दिवसांमध्ये आणखी एका फलंदाजाने भीमपराक्रम केलाय. या फलंदाजाने एकाच ओव्हरमधील 6 बॉलमध्ये 6 चौकार ठोकण्याचा कारनामा केलाय. रावलपिंडी स्टेडियममध्ये पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (Pak vs Eng, 1st Test) यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात हॅरी ब्रूकने (Harry Brook) हा कारनामा करुन दाखवलाय.  (pak vs eng 1st test harry brookes of england hits 6 fours in 6 balls against pakistans mohammed Ali bowling cricket news marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॅरी ब्रूकने 69 व्या ओव्हरमध्ये सलग 6 चौकार मारण्याचा कारनामा केलाय. तसेच काही षटकानंतर हॅरीने कसोटीतील पहिलंवहिलं शतकही पूर्ण केलं. दरम्यान इंग्लंडने पहिल्यादिवसखेर 4 विकेट्स गमावून 75 ओव्हर्समध्ये 506 धावा केल्या आहेत. हॅरी ब्रूक 101 आणि कर्णधार बेन स्टोक्स 34 धावांवर नाबाद आहेत.



इंग्लंडकडून या दोघांव्यतिरिक्त झॅक क्रॉली, बेन डकेट आणि ओली पोप या तिन्ही फलंदाजांनी शतकी खेळी केली. या तिघांनी अनुक्रमे 122, 107 आणि 108 धावा केल्या. तर माजी कर्णधार 23 धावा करुन माघारी परतला. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानकडून झाहीद मोहम्मदने सर्वाधिक 2 तर मोहम्मद अली आणि हरीस रौफ या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.