Asia Cup 2023 : आशिया कपच्या सुपर-4 सामन्यात भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला. पावसामुळे सामना दोन दिवस रेंगाळला गेला. मात्र, रिझर्व्ह डेला झालेल्या सामन्यात विराट (Virat Kohli) आणि केएल राहुलने (KL Rahul) पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने 356 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला 32 षटकांत 8 बाद 128 धावा करता आल्या. पाकिस्तानला रिझर्व्ह डेच्या पहिल्या दिवशी मोठा धक्का बसला. पाकिस्तानला जेव्हा उत्तर देण्याची वेळ आली, तेव्हा पाकिस्तानचे दोन खेळाडू मैदानात आलेच नाहीत. सामन्यात नेमकं काय झालं? पाकिस्तानवर ही वेळ का आली? याचं उत्तर आता समोर आलं आहे.


नेमकं कारण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हारिस रौफ भारताविरुद्ध पहिल्यांदाच बाहेर झाला गेला होता. हॅरिस रौफने राखीव दिवशी गोलंदाजी केली नाही. हाताच्या समस्येमुळे नसीम शाह भारतीय डावाच्या 49 व्या षटकात मैदानाबाहेर गेला होता आणि फलंदाजीसाठी मैदानातही परतला नाही. त्यामुळे या दोन्ही गोलंदाजांना absent hurt म्हणून त्यांना जाहीर केलं गेलं.


बॅकअप  टीम बोलवली


दुखापतग्रस्त हरिस रौफ आणि नसीम शाह फलंदाजीला आले नाहीत. त्यामुळे पाकिस्तान संघाला वर्ल्ड कपपूर्वी मोठा धक्का बसला आहे. तर आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला संधी मिळेल की नाही? असा सवाल विचारला जातोय. मात्र, बाबरने आता बॅकअप टीम बोलवल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानने वेगवान गोलंदाज शाहनवाज डहानी आणि जमान खान यांना बॅकअप खेळाडू म्हणून बोलावलं आहे.


खबरदारीचा उपाय...


दरम्यान, पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकापूर्वी खेळाडूंची तंदुरुस्ती आणि तंदुरुस्ती लक्षात घेऊन ही केवळ खबरदारीचा उपाय म्हणून दोघांना बसवलं आहे. हे दोघे संघाच्या वैद्यकीय समितीच्या निरिक्षणाखाली राहतील, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून कळवण्यात आलंय.


सुपर 4 मधील सामने-


पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश (PAK vs AFG) -  6 सप्टेंबर
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश (SL vs BAN) - 9 सप्टेंबर
भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) - 10 सप्टेंबर
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) - 12 सप्टेंबर
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (PAK vs SL) - 14 सप्टेंबर
भारत विरुद्ध बांग्लादेश (IND vs BAN) - 15 सप्टेंबर
फायनल सामना - 17 सप्टेंबर


पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ.