Kusal Mendis Century : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये वर्ल्ड कपमधील (World Cup) आठवा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका (Pakistan vs Sri Lanka) यांच्यात खेळवला जातोय. आजचा हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. नेदरलँडचा पराभव करून पाकिस्तानचा संघ दुसऱ्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे तर आशिया कपमधील पराभवाचा बदला घेण्याची तयारी देखील बाबर अँड कंपनीने केली आहे. तर दुसरीकडे साऊथ अफ्रिकेकडून लाजीरवाणा पराभव स्विकारल्यांतर श्रीलंकेला पहिल्या विजयाची आतुरता लागली आहे. अशातच आजच्या सामन्यात श्रीलंकेने आपली चूक सुधारली. श्रीलंकेच्या (Sri Lankan Cricket Team) टॉप ऑर्डरने आज चांगली खेळी केली अन् श्रीलंकाला मोठा धावसंख्या उभी करून दिली आहे. श्रीलंकेच्या डावात कुशल मेंडिस (Kusal Mendis) याने खणखणीत शतक ठोकलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याच्या दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर हसन अलीने कुसल परेराला बाद केले. त्याला आपल्या खेळीत भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर सलामीवीर निसांका आणि कुसल मेंडिस या जोडीने डाव सावरला त्यावेळी पाकिस्तानकडून एक मोठी चूक झाली. कुसल मेंडिसचे हात बसला नव्हता, त्यावेळी शाहीन शाह आफ्रिदीच्या एका उसळत्या बॉलवर खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुसल मेंडिसचा कॅच इमाम उल हकने (imam ul haq) सोडला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video) तुफान व्हायरल होत आहे. त्यानंतर मेंडिसने सुट्टी दिली नाही.


कुशल मेंडिसने सुत्र हातात घेतली अन् खणखणीत शतक ठोकलं. मेंडिसने 65 बॉलमध्ये 14 चौकार आणि 4 षटकार लगावत आपले शतक केले. यादरम्यान त्याने 156 च्या सरासरीने धावा चोपल्या. त्यानंतर त्याने हाणामारीचं तयारी केली दोन खणखणीत सिक्स खेचले पण एक मोठा फटका मारण्याच्या नादात कुशल मेंडिस बाद झाला. शेवटी इमाम उल हकने त्याचा कॅच घेतला. 77 बॉलमध्ये 122 धावांची वादळी खेळी त्याने केलीये.


पाहा Video



पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.


श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालगे, महेश तिक्षणा, मथिशा पाथिराना, दिलशान मदुशंका.