मुंबई: टीम इंडिय़ाचा कर्णधार विराट कोहली आपल्या नव नवीन रेकॉर्डसाठी सर्वांनाच परिचयाचा आहे. विराट कोहलीचा रेकॉर्ड मो़डण्याचं धाडस पाकिस्तानच्या खेळाडूनं केलं आहे. या खेळाडूनं आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करियरमध्ये कोहलीला मागे सोडत नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर करून घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजमने आपल्या सुवर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत जागतिक विक्रम केला आहे. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या वन डे सामन्यात शतकी खेळीदरम्यान त्याने ही कामगिरी केली. बाबर आजमने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 103 धावा केल्या. 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आजमचे वन डे सामन्यातील हे 13वं शतक आहे. या वन डे सामन्यात पाकिस्तानने 3 विकेट्सने  सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.


पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या या वन डेसामन्याआधी वन डे क्रिकेटमध्ये 13 शतक ठोकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हशिम अमलाच्या नावावर नोंदला गेला होता. तर भारतीय फलंदाजांमध्ये विराट कोहली दुसर्‍या क्रमांकावर होता.


 हाशिम अमलाने 83 डावांमध्ये 13 शतक झळकावले होते. तर विराट कोहलीनं तीन चेंडू अधिक म्हणजे 86 डावांमध्ये 13 शतक झळकवले होते. या दोघांनाही मागे सारत पाकिस्तानच्या फलंदाजानं 76 डावांमध्ये 13 शतक झळकवण्याचा विक्रम केला आहे. 


12 चेंडूमध्ये पाकिस्तान संघाला 14 धावांची गरज होती. त्यावेळी 4 विकेट्स बाकी होत्या. तर 6 चेंडू शिल्लक असताना 3 धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर शादाब खान आऊट झाला. तर पुढच्या तीन चेंडूवर एकही रन काढण्यात पाकिस्तानला यश मिळालं नाही. सहाव्या चेंडूवर खेळून फहीमनं पाकिस्तान संघाला विजय मिळवून दिला.