पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद चार सामन्यांसाठी निलंबीत
कारवाईमुळे सरफराजला दोन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामन्यांसाठी मुकावे लागणार आहे.
मुंबई : वर्णद्वेषी टीका केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद याच्यावर चार सामन्यांची बंदी घातली आहे. आयसीसीने ही कारवाई केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या अँडिल फेहलुकवायोला उद्देशून सरफराजने वक्तव्य केले होते. हे वक्तव्य त्याला चांगलेच महागात पडले आहे. त्याच्यावर चार सामन्यांची बंदी घातली आहे. चार सामन्यात बंदी घातल्याने सरफराजऐवजी पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू शोएब मलिककडे कर्णधार पदाची सुत्रे सोपवण्यात आली आहेत.
निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरुन ट्विट करुन दिली आहे. या कारवाईमुळे सरफराजला दोन एकदिवसीय सामन्यांना आणि दोन टी-20 सामन्यांमध्ये खेळता येणार नाही.
नक्की काय घडलं ?
पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिकेत डरबन येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळला गेला होता. या सामन्यादरम्यान सरफराजने अँडिल फेहलुकवायोवर त्याच्या वर्णावरून टीका केली होती. हे संपूर्ण वक्तव्य स्टंप मायक्रोफोनमध्ये चित्रित झालं होतं. वर्णवादी टीका केल्यामुळे सरफराजवर बंदीची मागणी करण्यात आली होती. लोकांच्या रोषाचा सामना करावा लागल्याने सरफराजने माफी देखील मागितली आहे. त्याने अँडिल फेहलुकवायोची भेट घेऊन ट्विटरद्वारे माफी मागितली होती.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये सरफराजनं फक्त फेहलुक्वायोवर वर्णावरून टीका केली नाही, तर त्याच्या आईबद्दलही काही शब्द वापरले. सरफराजनं हे वक्तव्य केलं तेव्हा माईक हेजमन आणि रमीझ राजा कॉमेंट्री करत होते. माईक हेजमन यांनी सरफराज नक्की काय म्हणाला? याबद्दल रमीझ राजा यांच्याकडे विचारणा केली. पण रमीझ राजा यांनी हसत या प्रश्नाच उत्तर देणं टाळलं. सरफराज काय म्हणला त्याचं भाषांतर करणं कठीण आहे. हे मोठं आणि दीर्घ वक्तव्य आहे, असं उत्तर रमीझ राजा यांनी दिलं.
काय म्हणाला होता सरफराज