Viral Video : पाकिस्तानचा (Pakistan) कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात एका शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. मे 31 पासून ते 3 जून पर्यंत सुरु असलेल्या हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या (Harvard Business school) या शैक्षणिक कार्यक्रमात या दोघांसह क्रीडा जगतातील आणखी काही बड्या स्टार्सनेही हजेरी लावली होती. मात्र फलंदाज मोहम्मद रिझवान याच्या नावाची सध्या जोरदार चर्चा होते आहे. याचं कारण म्हणजे मोहम्मद रिझवानचा व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यानचा रिझवानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमेरिकेत रस्त्याच्या मधोमध आपली कार थांबवून मोहम्मद रिझवानने नमाज अदा केल्याचा दावा व्हिडीओतून करण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये रिझवानची कार रस्त्याच्या कडेला उभी असल्याची दिसत आहे. तर दुसरीकडे फुटपाथवर रिझवान नमाज अदा करताना दिसत आहे. रिझवान याआधीही आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान मैदानावर नमाज अदा करताना दिसला होता. मात्र आता त्याने रस्त्यावरच नमा अदा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच चर्चा सुरु झालीय.



ओडिशातल्या घटनेवरही व्यक्त केले दुःख


ओडिशातल्या बालासोरमध्ये घडलेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेत 275 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर जगभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. क्रिकेटपटू रिझवाननेही याबाबत दुःख व्यक्त केले आहे. "मानवी जीवनाचे नुकसान हे नेहमीच वेदनादायक असते. माझ्या हृदयापासून प्रार्थना भारतातील रेल्वे दुर्घटनेत बाधित झालेल्यांसोबत आहेत," असे मोहम्मद रिझवानने म्हटलं आहे.


दरम्यान, कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनीही 31 मे ते 3 जून या कालावधीत हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये उपस्थिती लावली होती गेले. खुद्द बाबर आझमनेही या खास कार्यक्रमाचे काही फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले होते. या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात सहभागी होणारा ते पहिले क्रिकेटपटू ठरले आहेत. हा कार्यक्रम विशेषतः मनोरंजन, मीडिया आणि क्रीडा व्यवसाय (BEMS) वर केंद्रित आहे. क्रिकेट चाहत्यांच्या मते, दोन्ही क्रिकेटपटूंनी घेतलेला हा महत्त्वाचा उपक्रम क्रिकेटपटूंच्या नवीन पिढीला शिक्षणाबरोबरच क्रीडा कारकीर्दीसाठी प्रेरणा देईल. बाबर आणि रिझवान यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानसाठी एकत्र डावाची सुरुवात केली. दोघांनी पाकिस्तानसाठी काही महत्त्वाच्या खेळी खेळल्या आहेत.