Pakistan Team For T20 World Cup 2022 : टी-20 वर्ल्ड कप 2022 साठी  (T20 World Cup 2022) पाकिस्तान संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. संघाची कमान बाबर आझमच्या हाती आहे. त्याचवेळी संघात एका घातक  खेळाडूचे पुनरागमन झाले आहे. हा खेळाडू टीम इंडियाच्या फलंदाजांसाठी मोठा धोका आहे. या खेळाडूला दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेला (Asia Cup 2022) मुकावं लागलं होतं. मात्र आता हा खेळाडू भारतीय संघाचा सामना करेल हे निश्चित आहे. (pakistan cricket team announced squad for upcoming t 20 world cup shaheen afridi comeback) 


या खेळाडूची एन्ट्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून  टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा आधीच झालीय. आता पाकिस्ताननेही आपला संघ जाहीर केला आहे. या संघात पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचं shaheen afridi कमबॅक झालंय.  आशिया कप 2022 मध्ये शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) पाकिस्तान संघाचा भाग नव्हता.


दुखापतीमुळे संघाबाहेर


आशिया चषक 2022 पूर्वी शाहीन शाह आफ्रिदी उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. आता त्याच्या बाहेर पडल्यामुळे भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला होता. कारण शाहीन आफ्रिदी हा पाकिस्तानच्या बॉलिंग ग्रृपचा महत्त्वाचा भाग होता.  पण टी-20 विश्वचषक 2022 मध्ये शाहीन शाह आफ्रिदी पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांसमोर असणार आहे.


टी20 वर्ल्ड कपसाठी टीम पाकिस्तान


बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, शान मसूद आणि उस्मान कादिर.


राखीव खेळाडू : फखर जमान, मोहम्मद हारिस आणि शाहनवाज दहानी.