पाकिस्तानच्या `या` क्रिकेटरने गुपचूप केले तिसरे लग्न?
पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार इमरान खान पुन्हा एकदा लग्नावरून चर्चेत आला आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार इमरान खान पुन्हा एकदा लग्नावरून चर्चेत आला आहे. पाकिस्ताना तहरीके ए इंसाफचे प्रमुख इमरान खानने नववर्षात लाहोरमध्ये पुन्हा एकदा लग्न केले आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, इमरानला आध्यात्मिक उपदेश देणाऱ्या महिलेशीच इमरान विवाहबद्ध झाल्याचे समजतेय. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी इस्लामाबादमधील अंटी टेररस्जिम कोर्टात त्याला सुनावणीसाठी उपस्थित राहायचे होते.
काय आहे हा प्रकार?
पाक मीडिया रिपोर्टनुसार, इमरानच्या होणाऱ्या बायकोच्या नातेवाईकांच्या घरी हा विवाह झाला. रिपोर्टमध्ये पुढे सांगण्यात आले आहे की, पीटीआय कोर कमिटीच्या एका सदस्याने मुफ्ती मोहम्मद ने निकाहनामाचे वाचन केले. मुफ्ती मोहम्मदने ८ जानेवारी २०१५ मध्ये रेहान खानशी सार्वजनिकरित्या इमरानचा विवाह केला होता. यापूर्वी २०१४ मध्ये इमरानने एक गुप्त विवाह केला होता. जेव्हा मुक्तीला इमरानच्या विवाहाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी काही स्पष्ट सांगितले नाही.
पीटीआयचे राजनितीक सचिव आन चौधरी आणि प्रवक्ता नईम उल हक ने ही विवाह झाला नसल्याचे सांगितले. नईनने सांगितले की, मी पीटीआयशी गेल्या ३५ वर्षांपासून जोडलेला आहे. त्यामुळे त्याच्या आतील गोष्टी मला माहीत आहेत. त्यामुळे मी हे सांगू शकतो की असे काहीही झालेले नाही. जर त्यांना विवाह करायचा असता तर त्यांनी २०१८ च्या निवडणूकीनंतर केला असता.
पाक मीडियानुसार, १ जानेवारीला लग्नानंतर इमरान खान इस्लामाबादला पोहचले. तिथे कोर्टात त्यांच्यी केसची सुनावणी होती. त्या केसमध्ये इमरानला जामीन मिळाला.
पूर्वी केले होते लग्न
६३ वर्षांच्या इमरानने जानेवारी २०१५ मध्ये बीबीसीची माजी अॅंकर रेहम (४२) हिच्याशी विवाह केला होता. दोघांचाही हा दुसरा विवाह होता. रेहमला पहिल्या पतीपासून तीन मुले आहेत.
त्यापूर्वी इमरानने जेमिमा गोल्डस्मिथशी विवाह केला होता. विवाहाच्या नऊ वर्षांनी ते विभक्त झाले.