पाकिस्तान : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि पाकिस्तान 'तहरीक-ए-इंसाफ'चा प्रमुख इमरान खान तिसऱ्यांदा लग्न केलेय. १८ फेब्रुवारीला त्याने बुशरा खान नावाच्या एका महिलेसोबत लग्न केल.ती आध्यात्मिक शिक्षक आहे. इमरान खान आणि बुशरा यांचे लग्न रविवारी लाहोरमध्ये पार पडले.


बातम्या खऱ्या ठरल्या 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या दोघांच्या लग्नाच्या चर्चा याआधीही होत होत्या. पण इम्रानने त्या वृत्तांचे खंडन केले होते. पण त्या बातम्या खऱ्या ठरल्या आणि ते नुकतेच बंधनात अडकले. 
 
 बुशराला पहिल्या लग्नातून ५ मुलं आहेत. इम्रान खान आणि बुशरा यांची पहिली मुलाखत २०१५ मध्ये लोधरनमध्ये निवडणुकीच्या दरम्यान झाली.


इम्रानने ४२ वर्षाच्या पत्रकार रेहम खानशी दुसरे लग्न केलं. ९ महिन्यांनंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले.