मुंबई : टी 20 क्रिकेट विश्वाला नवा वर्ल्ड चॅम्पियन मिळाला. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात 8 विकेट्सने पराभव करत वर्ल्ड चॅम्पियन ठरला. पाकिस्तान क्रिकेट टीम या टी 20 वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार समजली जात होती. मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनल सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला आणि आव्हान संपुष्टात आलं. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 5 विकेट्सने मात केली. या पराभवानंतर पाकिस्तानच्या स्टार खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. (Pakistan faster bowler usman shinwari has announced retirment in test cricket)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या खेळाडूची निवृत्ती 


पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उस्मान शिनवारीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. उस्मानने केवळ एकाच कसोटी सामन्यात पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं होतं. उस्मानला गेल्या काही वर्षांपासून दुखापतीचा सामना करतोय. या दुखापतीमुळे उस्मानने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. उस्मानने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली.


उस्मान काय म्हणाला?


"मी फिजीओ जावेद मुगल यांचे आभार मानतो. त्यांच्यामुळे मी क्रिकेटमध्ये कमबॅक करु शकलो. आता मी फिट आहे. मी डॉक्टर आणि फिजीओंच्या सल्ल्यानुसार क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय. ज्यामुळे मी वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी अधिक वेळ देऊ शकेन", अशी पोस्ट उस्मानने केली आहे. उस्मानने पाकिस्तानसाठी 17 वनडे 16 टी 20 आणि 1 कसोटी सामना खेळला आहे. उस्मान पहिला आणि अखेरचा सामना हा 2 वर्षांपूर्वी श्रीलंका विरुद्ध खेळला होता. 


सेमी फायनलमधून पाकिस्तान बाहेर


पाकिस्तानने टी 20 वर्ल्ड कपमधील सुरुवात दणक्यात केली होती. बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानने टी 20 वर्ल्ड कपमधील सामन्यात टीम इंडियाचा 10 विकेट्सने पराभव केला होता. यानंतर साखळी सामन्यातील उर्वरित 4 सामन्यात अशा प्रकारे सलग 5 सामने जिंकले. मात्र सेमी फायनलमधील एका सामना पराभूत होताच, पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं.