T20 World Cup 2022 Virat Kohli: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सामन्यात विराट कोहलीची खेळी सर्वोत्तम ठरली. त्याच्या आक्रमक खेळीमुळे पाकिस्तानवर विजय मिळवता आला. विराट कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंजमाम उल हकनं (Inzmam Ul Haq) देखील विराट कोहलीच्या खेळीबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. केएल राहुल बाद झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) मैदानात उतरला. त्यानंतर रोहित शर्मा झटपट बाद झाला. त्यामुळे फलंदाजांवर दडपण आलं होतं. विराट कोहलीने 23 चेंडूत 15 धावा केल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानने दिलेलं 160 धावांचं लक्ष्य भारतासाठी अवघड होत चाललं होतं. पण विराट कोहलीला प्रत्येक रन्सचं महत्त्व कळतं. विराट कोहली आपल्या अंदाजात धावा करत गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने पुढच्या 30 चेंडूत 67 धावा केल्या. शेवटच्या 11 चेंडूत त्याने 36 धावा केल्या. विराटची ही खेळी पाहून पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक आश्चर्यचकीत झाला आहे. विराट कोहलीकडे एकहाती सामना जिंकण्याची कसब आहे. तो कोणत्याही दबाबात धावा करू शकतो, असं इंजमाम उल हकनं सांगितलं.


T20 WC 2022: फक्त तीन सामने आणि भारत उपांत्य फेरीत! पाहा कसं असेल गणित


इंझमाम उल हकनं सांगितलं की, 'भारतीय संघाच्या विजयाचे सर्व श्रेय विराट कोहलीला द्यायला हवे. तो ज्या पद्धतीने खेळला ते शानदार आहे. विराट हा फक्त अशा प्रकारचा खेळाडू आहे अशी कामगिरी तोच करू शकतो. तो चांगला खेळला आणि ही एक चांगली खेळी होती. एकहाती सामने जिंकण्याची क्षमता त्याच्यात आहे. काही खेळाडू धावा करतात पण मॅच जिंकवू शकत नाही. पण विराट धावाही करतो आणि मॅचही जिंकवतो."