भर कार्यक्रमात पडली शाहिद आफ्रिदीचीच `विकेट`; क्रिकेटचं अज्ञान आलं समोर
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी नेहमी आपल्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत असतो.
मुंबई : पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी नेहमी आपल्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत असतो. मात्र आता चर्चेत येण्यामागचं कारण काही वेगळचं ठरलं आहे.आपल्या क्रिकेटमधील अज्ञानामुळे तो चर्चेत आला आहे. या संबंधित त्याचा व्हिडिओ समोर आला असून, तो सध्या ट्रोल होत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शाहिद आफ्रिदीने अनेक विषयावर आपले मतं मांडत असतो. अनेक शोजमधली त्याची डिबेंटसही समोर आली होती. अनेकदा शाहिदच्या विधानामुळे मोठा वादही झालाय. नुकतचं त्याने एका पाकिस्तानी शो मध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये बोलताना त्याचे क्रिकेट अज्ञान समोर आले होते.
नेमकं कार्यक्रमात काय झालं?
फैजल कुरेशीच्या सलाम जिंदगी या कार्यक्रमात आफ्रिदीने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आफ्रिदीसोबत काही खेळ खेळवण्यात आले. या खेळात कानावर हेडफोन लावून मोठे संगीत वाजवून समोरची व्यक्ती नेमकं काय बोलायचा प्रयत्न करतेय, हे ओळखण्याचा हा खेळ होता. या खेळात आफ्रिदीला लेग बिफोर विकेट ( LBW) हा शब्द विचारण्यात आला. मात्र आफ्रिदीला तो ओळखताचं आला नाही. त्याने लेग व बिफोर हे शब्द ओळखले, परंतु त्याला विकेट हा शब्द ओळखताचं आला नाही.
हा गेम संपल्यानंतर हेडफोन काढून त्याला हा शब्द सांगण्यात आला. तेव्हा त्याने विचारलं की, लेग बिफोर विकेट काय असते? हा क्रिकेटमधील कोणता शब्द आहे? तो पुढे म्हणतो, मी पहिल्यांदाच हा शब्द ऐकतोय. लेग बिफोर विकेट हा क्रिकेट संबंधित शब्द आहे हे मला आजच माहीत पडतंय. मला वाटलं LBW ला हिट विकेट म्हणतात.
२० वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या आफ्रिदीला LBW म्हणजे काय हे माहीत नसल्याचा तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून आता आफ्रिदीवर चौफेर टीका होतेय.