मुंबई : टी-20 वर्ल्डकपला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. टी-20 विश्वचषकात भारतासोबतच्या शानदार सामन्यासाठी पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम 24 ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तानने आपल्या 12 खेळाडूंची नावं 24 तास अगोदर घोषणा केलीये. त्यापैकी प्लेइंग -11 ची निवड केली जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शोएब मलिकचं पाकिस्तान टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तसंच मोहम्मद हाफिजसारखे वरिष्ठ खेळाडूही पाकिस्तानच्या संघात आहेत.


भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान संघ


बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, शाहीन आफरीदी, हसन अली, हरीस रऊफ, हैदर अली 


भारत आणि पाकिस्तानसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. टी-20 विश्वचषक 2021च्या सुपर-12 फेरीत दोन्ही संघांचा हा पहिला सामना आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना चांगली सुरुवात करायची आहे. दरम्यान आपण रेकॉर्ड पाहिला तर आतापर्यंत दोन्ही संघांनी T-20 वर्ल्कपमध्ये पाच सामने खेळले आहेत आणि पाचही सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे.


दरम्यान, आतापर्यंत प्रत्येक तज्ज्ञाने असं म्हटलं आहे की, भारत पाकिस्तान सारख्या मोठ्या सामन्यात काहीही होऊ शकतं. परंतु या सामन्यात टीम इंडियाची पारडं जड आहे. टीम इंडियाने त्यांचे दोन्ही सराव सामने जिंकलेत आणि ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांना पराभूत केले.