IND vs PAK: `भारत नाही आला तर...`, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची टीम इंडियाला धमकी
Champions Trophy 2025: पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत बीसीसीआयकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दरम्यान, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने मोठे वक्तव्य केले आहे.
Rashid Latif Statement on Team India: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) ही स्पर्धा खेळणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहे. आता या स्पर्धेसाठी भारतीय टीम (Team India) पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये 8 संघांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही. एवढचं नाही तर ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जाईल. या दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफ यांनी एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. राशिद लतीफने एकप्रकारे भारतीय टीमला धमकी दिली आहे.
माजी कर्णधाराची भारताला धमकी
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक-फलंदाज रशीद लतीफ यांनी मोठं वक्तव्य केलं असून जर भारताने पाकिस्तानला येण्यास नकार दिल्यास पाकिस्तान आयसीसीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकेल, असे सांगत भारताला धमकी दिली आहे. रशीदच्या म्हणण्यानुसार, भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार देऊ शकत नाही, कारण ही आयसीसीची स्पर्धा आहे आणि भारताने त्यासाठी करार केला आहे.
हे ही वाचा: IND vs SA: भारताचे राष्ट्रगीत सुरू होताच थांबले आणि मग... डर्बनमधला Video Viral
नक्की काय म्हणाले रशीद लतीफ?
माजी पाकिस्तानी क्रिकेटर रशीद लतीफ एका पाकिस्तानी न्यूज शो दरम्यान म्हणाले की, "ही आयसीसी इव्हेंट आहे. 2024-2031 च्या सायकल वर त्यांची स्वाक्षरी झाली आहे. सर्व प्रसारक आणि प्रायोजकांनी चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांसाठी साइन अप केले आहे. कोणतेही ठोस कारण न देता कोणताही संघ स्पर्धेत येण्यास नकार देऊ शकत नाही."
'भारत नाही आला तर...'
रशीद पुढे म्हणाले की, "आयसीसीचे अस्तित्व केवळ पाकिस्तान आणि भारतासाठी आहे. आम्हीही खेळणार नाही असे पाकिस्तान सरकार म्हणाले तर आयसीसीचा काही अर्थ नाही कारण सामना कोणी पाहणार नाही. आपण असे म्हणू शकतो की भारत द्विपक्षीय सामने खेळू इच्छित नाही, परंतु आपण आयसीसी कार्यक्रमास नकार देऊ शकत नाही. कारण त्यांनी त्यावर आधीच स्वाक्षरी केली आहे. जर भारत आला नाही तर पाकिस्तान या स्पर्धेत सहभागी न होऊन मोठे पाऊल उचलेल."
हे ही वाचा: Pro Kabaddi League: तेलुगु टायटन्सने केली पुणेरी पलटणवर मात, बोनस गुण ठरले निर्णायक
'सेफ्टी हे कारण असू शकत नाही...'
रशीद लतीफ म्हणाले, "एखाद्या संघाने भाग घेण्यास नकार दिला, तर त्याला त्याच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी ठोस कारणे द्यावी लागतील. जसे 1996 मध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया श्रीलंकेला गेले नाहीत, तरीही अंतिम फेरीत पोहोचले. सुरक्षेचे कारण दिले तर ते ठोस कारण नाही. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारखे संघ पाकिस्तानात येत आहेत."