कराची : पाकिस्तानने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजला जबरदस्त मात दिलीये. कराचीमध्ये ९ वर्षांनी आंतरराष्ट्रीय सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ विकेट गमावत २०३ धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून पाहुणा संघ १३.४ ओव्हरमध्ये अवघ्या ६० धावाच करु शकला. हा टी-२०मधील वेस्ट इंडिजचा सर्वात कमी स्कोर आहे.  याआधी त्यांनी ७९/७ इतका कमी स्कोर केला होता. हा स्कोर झिम्बाब्वेविरुद्ध केला होता. 


पाकिस्तानचा सर्वात मोठा विजय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजच्या पराभवाचे कारण संघात स्टार खेळाडू नसणे होय. क्रिस गेल, किरेन पोलार्ड यांची कमतरता जाणवतेय. वेस्ट इंडिजकडून सॅम्युअल्स(१८) आणि रयाद इमरित यांनी ११ धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या केवळ दोन क्रिकेटर्सना दुहेरी धावसंख्या करता आली. पाकिस्तानचा हा विजय टी-२० इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. सर्वात मोठा विजय श्रीलंकेने(१७२) केनियावर २००७मध्ये मिळवला होता. त्यासोबतच पाकिस्तानने टी-२०मध्ये दुसऱ्यांदा २०३ इतकी मोठी धावसंख्या उभारलीये.


याआधी २००८मध्ये बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानने इतक्याच धावा केल्या होत्या. बांगलादेश तो सामना १०२ धावांनी हरला होता.