Zainab Abbas Viral Video : क्रिकेटचा सामना चालू असताना स्टेडिमयमध्ये काहीतरी विचित्र किंवा हसायला भाग पाडणारे अनेक किस्से घडताना आपण पाहिले आहेत. अशातच एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये पाकिस्तानची अँकर झैनाब अब्बास थोडक्यात वाचल्याचं पाहायला मिळालं. अन्यथा तिला मोठी दुखापत झाली असती, दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये हा प्रसंग घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं? 
बुधवारी म्हणजेच 18 जानेवारीला लीगमधील सनराईजर्स इस्टर्न केप आणि एमआय केपटाऊन यांच्यात सामना चालू होता. सीमारेषेजवळ पाकिस्तानची प्रसिद्ध अँकर झैनाब अब्बास ही मुलाखत घेत होती. मुलाखत घेत असताना इस्टर्न केपच्या मार्को यानसेनने लेग साईडला जोरदार चेंडू टोलावला. चेंडूला अडवण्यासाठी एमआय केपटाऊनच्या दोन खेळाडूंनी धाव घेतली होती मात्र, दोघांच्या गॅपमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. 



हा चेंडू अडवताना एका खेळाडूने डाय मारली पण त्याचे प्रयत्न अपूरे पडले आणि अखेर चौकार गेला. यादरम्यान फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूचा मुलाखत घेत असलेल्या झैनाबला पाय लागला. खेळाडूचा पाय जोरात लागल्यामुळे झैनाबचा तोल जातो आणि ती खाली पडते. झैनाब ज्यांची मुलाखत घेत होती ते तिला पडल्यावर सावरत असल्याचं दिसत आहे. सुपर स्पोर्ट्सने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. 


दरम्यान, एमआय केपटाऊन संघाने पहिल्यांदा बॅटींग करताना रूलोफसेनच्या अर्धशतकाच्या जोरावर 171 धावा केल्या होत्या. सनराईजर्स इस्टर्नकडून आफ्रिकेचा युवा खेळाडू मार्का यानसेनने अवघ्या 27 चेंडूत तब्बल 66 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.