Pakistani Boxer Zohaib Rasheed : कोणत्या ना कोणत्या कारणाने पाकिस्तान नेहमीच चर्चेत असतो. देशातली महागाईमुळे पाकिस्तानातली जनता त्रस्त झाली आहे. अशातच तिथले लोक देखील जगात त्यांच्या देशाची मान शरमेने खाली घालायला लावत आहेत. ऑलिम्पिक पात्रतेचे स्वप्न घेऊन इटलीत गेलेल्या पाकिस्तानच्या बॉक्सरवर चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. पाकिस्तानी बॉक्सर जोहेब रशीदने केलेल्या कृत्यामुळे जगभरात देशाची आणि त्याची बदनामी होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पाकिस्तानातून इटलीला पोहोचलेल्या बॉक्सरच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. इटलीत पाकिस्तानी संघाच्या स्टार बॉक्सरवर चोरीचा आरोप आहे. पाकिस्तानी बॉक्सरने त्याच्या महिला बॉक्सर साथीदाराचे पैसे चोरले असून तो फरार झाला आहे. त्यामुळे त्यांच्या देशासाठी हे अत्यंत लाजिरवाणे कृत्य असल्याचे म्हणत त्यांच्यावर टीका होत आहे.


पाकिस्तानी बॉक्सर जोहेब रशीद इटलीमध्ये सहकाऱ्याच्या बॅगेतून पैसे चोरून बेपत्ता झाला आहे. बॉक्सिंगपटू राशिद ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेण्यासाठी इटलीला गेला होता. यानंतर स्पर्धेत सहभागी होण्याऐवजी त्याने चोरी केली.  पाकिस्तानच्या बॉक्सिंग महासंघाने मंगळवारी याबाबत खुलासा केला. फेडरेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इटलीतील पाकिस्तान दूतावासाला याची माहिती दिली असून याप्रकरणी पोलीस तक्रारही दाखल केली आहे.


बॉक्सिंग राष्ट्रीय महासंघाचे सचिव कर्नल नसीर अहमद यांनी सांगितले की, जोहेब रशीदची ही कृती महासंघ आणि देशासाठी अत्यंत लज्जास्पद आहे. तिथल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेणाऱ्या पाच सदस्यीय संघाचा तो भाग होता. जोहैबने गेल्या वर्षी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. जोहेब रशीदला पाकिस्तानमध्ये एक उदयोन्मुख खेळाडू मानले जात होते. मात्र आता त्याच्या या कृतीने सर्वांना धक्का बसला.


नसीर अहमद म्हणाले की, "लॉरा इकराम नावाची महिला बॉक्सरही तिथे प्रशिक्षणासाठी गेली होती. त्यादरम्यान रशीदने समोरच्या डेस्कवरून रूमची चावी काढून पर्समधून विदेशी चलन चोरले. तेव्हापासून तो हॉटेलमधून बेपत्ता होता. पोलिसांना याबाबत कळवण्यात आले असून त्याचा शोध सुरू आहे, मात्र त्यांने कोणाशीही संपर्क साधलेला नाही."