टीममध्ये निवड न झाल्यानं `या` खेळाडूंन उचलंल टोकाचं पाऊल
टीममध्ये निवड न झाल्याने एका खेळाडूने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : क्रीडा विश्वात सध्या क्रिकेटची चलती आहे. क्रिकेट पाहणाऱ्यांचा आकडा हा इतर खेळांच्या तुलनेत अधिक आहे. आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. मात्र ते स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. मात्र अशावेळेस देशांतर्गत स्पर्धेत या खेळाडूंना आपल्याती गुण दाखवण्याची संधी मिळते. मात्र या अशा स्पर्धेत निवड न झाल्याने एका खेळाडूने टोकाचं पाऊल उचललं आहे. टीममध्ये निवड न झाल्याने एका खेळाडूने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. (pakistani cricketer shoaib has tried suicide due to not selected in team squad)
पीसीबी अर्थात (Pakistan Cricket Team) पाकिस्तान क्रिकेट बोर्डांतर्गत होणाऱ्या इंटरसिटी चॅम्पियनशीप स्पर्धेत निवड न झाल्याने खेळाडूने टोकाचा निर्णय घेतला. या वेगवान गोलंदाजाने स्वत:चा हात कापण्याचा प्रयत्न केला. शोएब असं या क्रिकेटरचं नाव आहे. शोएबने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समजताच त्याच्या कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात नेलं.
संधी न मिळाल्याने टोकाचं पाऊल
प्रशिक्षकाने शोएबची इंटरसिटी चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी संघात निवड केली नाही. त्यानंतर शोएबने स्वत:ला कोंडून घेतलं. "शोएब घरातील बाथरूममध्ये सापडला तेव्हा त्याचं मनगट कापलेलं दिसलं. शोएब बेशुद्ध पडला होता. आम्ही त्याला ताबडतोब रुग्णालयात नेलं, जेथे त्याची प्रकृती गंभीर आहे", अशी माहिती शोएबच्या कुटुंबियांनी दिली.