मुंबई : ICC T20 विश्वचषकाच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पण सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज अर्धशतकामुळे भारताने संघर्षपूर्ण धावसंख्या उभारली. भारताने 20 षटकात 9 गडी गमावून 133 धावा केल्या. लुंगी एनगिडीच्या घातक गोलंदाजीसमोर भारताच्या पाच विकेट 49 धावांत पडल्या. लुंगी एनगिडीने 4 तर वेन पारनेलने 3 विकेट घेतल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मैदानावर पाकिस्तानचे चाहते देखील भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी पोहोचले होते. कारण पाकिस्तान संघाला सेमीफायनल गाठायची असेल तर त्यांना सर्व सामने जिंकावे लागतील आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ पराभूत होणं आवश्यक होतं. पण तसं झालं नाही. दक्षिण आफ्रिका संघ जिंकल्याने पाकिस्तान संघाची सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या चाहत्यांची देखील निराशा झाली आहे.


              संघ              सामने    विजय    पराभव   ड्रॉ    गुण      नेट रनरेट


  1. दक्षिण आफ्रिका    3            2          0         0       5         +2.772

  2. भारत                 3            2          1         0       4         +0.844

  3. बांग्लादेश            3            2          1         0       4         -1.533

  4. झिम्बॉम्बे             3            1          1         0       3         -0.050

  5. पाकिस्तान           3            1          2         0       2         +0.765

  6. नेदरलँड्स           3            0          3         0       0         -1.948


दोन्ही गटातून फक्त दोनचं टीम सेमीफायनल सामन्यासाठी क्वालिफाय होणार आहेत. सध्या पाकिस्तान संघ पाचव्या स्थानावर आहे. टीम इंडियाला सगळे सामने जिंकावे लागतील. पण झिम्बॉम्बे आणि दक्षिण आफ्रिकेला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला तरच पाकिस्तानला संधी होती. त्यामुळे आता पाकिस्तानी संघाचा प्रवास जवळपास संपुष्टात आल्याचं दिसतंय.