या बॅट्समनने वन-डे क्रिकेटमध्ये ठोकली डबल सेंच्युरी, बनवले `हे` रेकॉर्ड
पाकिस्तानचा बॅट्समन कामरान अकमल याने क्रिकेट मैदानात धडाकेबाज बॅटिंग करत डबल सेंच्युरी लगावली आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानचा बॅट्समन कामरान अकमल याने क्रिकेट मैदानात धडाकेबाज बॅटिंग करत डबल सेंच्युरी लगावली आहे.
पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये खेळलेला कामरान अकमल हा स्ध्या स्थानिक क्रिकेट टूर्नामेंटमध्ये खेळत आहे. त्याने या टूर्नामेंटमध्ये डबल सेंच्युरी लगावत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.
पाकिस्तानचा तिसरा बॅट्समन
अकमल याने केलेल्या धडाकेबाज बॅटिंगमुळे तो पाकिस्तानचा तिसरा बॅट्समन बनला आहे ज्याने स्थानिक क्रिकेट टूर्नामेंटमध्ये डबल सेंच्युरी लगावली आहे.
या क्रिकेटर्सने केलीय डबल सेंच्युरी
कामरान अकमल याच्याआधी पाकिस्तानकडून खेळताना मोहम्मद अली याने २०७ रन्स, खालिद लतीफने २०४ रन्सची नॉट आऊट इनिंग खेळली होती.
धडाकेबाज इनिंग
डिपार्टमेंटल वन-डे कपमध्ये वॉटल अँड पॉवर डेव्हलपमेंट अथॉरिटी टीम (WAPDA)कडून खेळताना अकमलने १४८ बॉल्समध्ये २०० रन्सची शानदार इनिंग खेळली. या इनिंगमध्ये अकमलने २७ फोर आणि ६ सिक्सर लगावले.
दुसऱ्याच बॉलमध्ये आऊट
कामरान अकमल याने २०० रन्स पूर्ण केले आणि त्यानंतर लगेचच पुढच्या बॉलवर तो आऊट झाला. जोहेबच्या बॉलिंगवर जमाल अनवर याने अकमलला स्टंप आऊट केलं.
अकमलने 'हे' रेकॉर्ड्स बनवले
१४७ बॉल्समध्ये डबल सेंच्युरी लगावत अकमल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत ११व्या स्थानावर पोहोचला आहे. सर्वात वेगवान डबल सेंच्युरी लगावणाऱ्या बॅट्समनच्या यादीत तो ११व्या स्थानावर पोहोचला आहे.
डबल सेंच्युरी लगावणारा तो पाकिस्तानमधील पहिलाच विकेटकीपर ठरला आहे.
कामरान अकमलने या इनिंगमध्ये २७ फोर लगावले आणि लिस्ट-ए च्या मॅचमध्ये पाकिस्तानी प्लेअर्सने लगावलेले हे सर्वाधिक फोर आहेत.
यापूर्वी अकमलने नॅशनल टी-२० टूर्नामेंटमधील ८ इनिंग्समध्ये ४३२ रन्स बनवले होते. यामध्ये देशातील सर्वोच्च टी-२० स्कोअर (१५० रन्स)चा समावेश आहे. कामरान अकमलने ५३ टेस्ट, १५७ वन-डे आणि ५८ टी-२० मॅचेस खेळल्या आहेत. यामध्ये त्याने टेस्टमध्ये २६४८ रन्स, वन-डेमध्ये ३२३६ आणि टी-२०मध्ये ९८७ रन्स केले आहेत.