पाकिस्तान : आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2021च्या आधी पाकिस्तान क्रिकेट संघात आणखी एक बदल करण्यात आला आहे. आता एका अनुभवी क्रिकेटपटूने तसंच या फॉरमॅट चॅम्पियन राहिलेल्या संघात प्रवेश केला आहे.


शोएब मलिकला लागली लॉटरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाठीच्या दुखापतीमुळे शोएब मकसूद 2021च्या टी-20 वर्ल्डकप बाहेर पडला आहे. त्याच्या जागी प्रसिद्ध क्रिकेटपटू शोएब मलिकचा पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला आहे. 7 ऑक्टोबर रोजी शोएब मकसूदच्या पाठीचा एमआरआय स्कॅन करण्यात आला. स्कॅन करण्यात आलं त्याच्या आधीच्या दुखापत झाली होती. त्यानंतर तो गुरुवारी मध्य पंजाबविरुद्धचा सामना खेळू शकला नाही.



पाकिस्तान संघातील मुख्य निवडकर्ता मोहम्मद वसीम म्हणाले, "टी-20 विश्वचषक 2021 बाहेर असताना शोएब मकसूद निराश झाला आहे. कारण त्याने या स्पर्धेसाठी खूप मेहनत केली होती आणि तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. पण दुखापत हा खेळाचा भाग आहे. मला खात्री आहे की रिहॅबिलीटेशन गेल्यानंतर तो पूर्णपणे फीट होईल. 


'मलिकचा अनुभव उपयोगी येईल'


मोहम्मद वसीम पुढे म्हणाला, 'टीम मॅनेजमेंटशी बोलल्यानंतर आम्ही शोएब मलिकला त्याच्या जागी समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. मला आशा आहे की, शोएबचा अनुभव संपूर्ण संघासाठी फायदेशीर ठरेल."


मलिकने 5 वेळा टी-20 वर्ल्डकप खेळला आहे


शोएब मलिकला टी-20 वर्ल्डकपचा ​​खूप अनुभव आहे. तो 2007 साली पाकिस्तान संघाचा कर्णधार होता, 2009 मध्ये तो चॅम्पियन टीमचा सदस्य होता. तो 2012 ची एडिशन चुकला, परंतु नंतर 2012, 2014 आणि 2016 मध्ये त्याने या ग्लोबल टूर्नामेंटमध्ये भाग घेतला.