मुंबई : इंडिया-ए संघाने मनीष पांडेच्या कॅप्टन्सी खाली ट्राई वनडे क्रिकेट सीरीज मध्ये अफगानिस्तान-एचा 113 रन्सने पराभव केला. इंडिया-एचा विजयामध्ये मनीष पांडे, ऋषभ पंत आणि कृणाल पांड्याने महत्त्वाची भूमिका निभावली. सिरीजमध्ये भारतीय ए संघाने दुसरा विजय मिळवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार मनीष पांडेने (86) आणि ऋषभ पंतने (60) रन केले. 5 विकेट गमवत भारताने 322 रन बनवले. कृणाल पांड्याने 27 बॉलमध्ये 48 रन केले. पांडेने त्याच्या इनिंगमध्ये 9 फोर आणि 1 सिक्स लगावला. पंतने 5 फोर आणि 1 सिक्स लगवला तर पांड्याने 7 फोर आणि 1 सिक्स लगावला.


अफगानिस्तानची टीम 9 विकेट गमवत फक्त 209 रन करु शकली. याआधी इंडिया-ए ने अफगानिस्तान-एला 28 जुलैला खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये ७ विकेटने हरवलं होतं.