अबुधाबी : मुंबई इंडियन्सचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याने आयपीएलमध्ये 'ब्लॅक लाइव्स मॅटर' चे समर्थन केले आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या फलंदाजीदरम्यान गुडघ्यावर बसला आणि 'ब्लॅक लाइव्स मॅटर'ला त्याने पाठिंबा दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अष्टपैलू खेळाडूने 21 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या. त्याने 19 व्या ओव्हरमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. या दरम्यान, त्याने एका गुडघ्यावर बसून आपला उजवा हात उंचावला आणि वर्णद्वेषाविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेस पाठिंबा दर्शविला.


वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबईचा कर्णधार कीरोन पोलार्डने त्याचा उजवा हात वर करून त्याला साथ दिली.


पांड्याने सामन्यानंतर फोटो ट्विट करत 'ब्लॅक लाइव्स मॅटर' असे कॅप्शन दिले.


सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असलेला वेस्ट इंडीजचा कसोटी कर्णधार जेसन होल्डरने गेल्या आठवड्यात निराशा व्यक्त केली की आयपीएलच्या कोणत्याही संघाने या मोहिमेला पाठिंबा दर्शवला नाही.


मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात पांड्याने नाबाद 60 रन केले. पण स्टोक्स आणि सॅमसनने तिसर्‍या विकेटसाठी 152 धावांची भागीदारी करत राजस्थानला आठ विकेट्सने विजय मिळवून दिला.