नवी दिल्ली : भारतीय क्रीडापटूवर बर्लिनमध्ये पैसे 'भिक' मागण्याची वेळ आली आहे, बर्लिनमध्ये गेल्यानंतर या दिव्यांग जलतरणपटूला पैसे न मिळाल्याने ही वेळ आली आहे, मात्र भारतीय पॅरालंपिक समितीने बुधवारी भारतीय पॅरालंपिक जलतरणपटूशी बर्लिनमध्ये झालेल्या या घटनेबाबत हात झटकले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या खेळाडूंना मंजूर करण्यात आलेला निधी, समितीचे अध्यक्ष उपलब्ध नसल्याने वितरीत करता आली नाही. कंचनमाला पांडेसह पाच खेळाडूंनी पॅरालंपिक बर्लिन पॅरा स्वीमर चॅम्पियनशीपमध्ये भाग घेतला होता, मात्र त्यांना बर्लिनमध्ये पैसे देण्यात आले नाहीत, त्यांनी त्यांची सोय स्वत: करावी असं सांगून वाऱ्यावर सोडण्यात आलं.


सुदैवाने या खेळाडूंच्या मदतीला त्यांचे मित्र धावून आले, त्यांनी काही पैशांची मदत त्यांना केली. मात्र त्यांना बिना तिकीट यात्रा केल्याचा दंड देखील लावण्यात आला, कारण त्यांना गरजेएवढा पैसा देखील देण्यात आला नाही. क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेणार असल्याचं म्हटलं आहे. गोयल समितीने या विषयी १० दिवसाता रिपोर्ट मागितला आहे.