Swapnil Kusale Win Bronze Medal in Paris Olympics 2024: भारतीय नेमबाज स्वप्निल कुसळेनने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोजिशन क्वालिफिकेशनमध्ये स्वतःला वेगळा ठसा उमटवला आहे. स्वप्नील कुसळेला ब्राँझ मेडल मिळालं आहे. आता तो तिसऱ्या स्थानावर आहे. आत दिवसभर भारतात स्वप्नील कुसळे याचीच जोरदार चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतासाठी पॅरिस ऑल्मिपिक आतापर्यंत अतिशय खास राहिली आहे. कारण यावेळी भारताने ऑल्मिपिकमध्ये आपली दोन्ही पदके हे नेमबाजमध्येच जिंकले आहे. मनु भाकरने 10 मीटर पिस्तुलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे तर 10 मीटर पिस्तुल मिक्स्ड टीममध्ये सरबज्योत सिंहने कांस्य पदक मिळवलं आहे. 


स्वप्निल कुसळेने देशाला आणखी एक पदक मिळवून दिलं आहे. 10 मीटर पिस्तुल या खेळाच्या तुलनेत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन अतिशय वेगळा खेळ आहे. यामध्ये अंतर देखील जास्त असते तसेच पिस्तुलाच्या जागी रायफलचा वापर केला जातो. 


काय आहे 'रायफल थ्री पोझिशन'?


रायफल पकडण्यासाठी वेगवेगळ्या पोझिशनचा वापर केला जातो. 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये रायफल पकडण्यासाठी एकूण तीन प्रकारच्या पोझिशनचा वापर केला जातो. यामुळेच या खेळाला 50 मीटर रायफल 'थ्री पोझिशन' असं म्हटलं जातं. 


50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये शूटर टारगेटवर तीन वेगवेगळ्या पोझिशनने शुटिंग करतात. निलिंग पोझिशन (गुडघ्यावर बसून), प्रोन प्रोझिशन (पोटावर झोपून) आणि स्टँडिंग पोझिशन (उभं राहून).


यामध्ये पहिल्यांदा गुडघ्यावर बसून नंतर पोटावर झोपून आणि शेवटी उभं राहून टारगेटवर निशाणा साधला जातो. शूटरला या तीन वेगवेगळ्या पोझिशनमध्ये स्कोर करायचे असतात. प्रोन पोझिशनमध्ये रायफलला सर्वाधिक स्थिरता आवश्यक असते. तर स्टँडिंग पोझिशनमध्ये रायफलला स्थिरता देणे एक मोठे आव्हान असते. 


स्वप्नील कुसळेचा गेम 


स्वप्नील कुसळेने डावाची संथ सुरुवात केली. त्याने 153.3 (पहिली मालिका- 50.8, दुसरी मालिका- 50.9, तिसरी मालिका- 51.6) धावा केल्या. तो सहाव्या क्रमांकावर राहिला. यानंतर, त्याने प्रोनमध्ये (पहिली मालिका- 52.7, दुसरी मालिका- 52.2, तिसरी मालिका- 51.9) 156.8 गुण मिळवून आपली स्थिती सुधारली. प्रोननंतर तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला होता.