Paris Olympics 2024 : अर्शद नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्डसह सुवर्ण आणि नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकल्यानंतर काय होती पाकिस्तानची प्रतिक्रिया?
Arshad Nadeem Wins Gold And Neeraj Chopra Silver Medal : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत पाकिस्तान खेळाडू अर्शद नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्ड केला आणि सुवर्ण पदक जिंकलं. तर भारतीय खेळाडू नीरज चोप्राला रौप्यपदक मिळालं. त्यानंतर पाकिस्तानची काय प्रतिक्रिया होती पाहूयात.
Arshad Nadeem Wins Gold And Neeraj Chopra Silver Medal : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धा ही जणू पाकिस्तान विरुद्ध भारत अशी रंगली. पहिल्या फेरीत पाकिस्तानचा खेळाडू अर्दश नदीम आणि भारतीय खेळाडू नीरज चोप्रा थ्रो फाऊल गेला. सुवर्ण पदकासाठीच्या खेळात तो खूप दबावात आहे असं जाणवत होतो. पण दुसऱ्या फेरीसाठी जेव्हा अर्दश मैदानात भाला फेकायला आला तेव्हा त्याने ऑलिम्पिक रेकार्ड बनवला. त्याने ऑलिम्पिकमध्ये सर्वात लांब 92.97 मीटरवर भाला फेकून रेकार्ड आपल्या नावावर केला. त्यानंतर तो 12 खेळाडूंच्या रांगेत नंबर एकवर जाऊन बसला.
त्यानंतर भारताकडून दुसऱ्या प्रयत्नात नीरज चोप्रा अर्दशचा रेकार्ड मोडणार का याकडे भारतीयांच्या नजरा लागल्या होता. नीरज मैदानात आला आणि त्याने भाला फेकला अन् हे काय 89.45 थ्रो करुन अर्दशचा जवळ जाणाचा प्रयत्न केला. यानंतर या दोघांचा रेकार्ड कुठलाही खेळाडू मोडू शकला नाही. त्यामुळे आशियातील या दोन पोरांनी सुवर्ण पदक आणि रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं.
जिंकल्यानंतर नीरज काय म्हणाला?
पाकिस्तानच्या अर्दशने गोल्ड पदक हिसकवल्यानंतर नीरज चोप्रा म्हणाली की, कुठलाहीतरी दिवस खेळाडूंना दिवस असतो. आज अर्दशचा दिवस होता. त्या दिवशी खेळाडूची शरीरयष्टी वेगळी असते. आज अर्शदसाठी जसे होते तसे सर्व काही परफेक्ट आहे. टोकियो, बुडापेस्ट आणि त्यातही त्याचा दिवस होता. आशियाई खेळ.'
तर नीरजची आई म्हणाली...,
रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरजची आई म्हणाली की, 'आम्ही खूप आनंदी आहोत. आमच्यासाठी चांदीही सोन्याच्या बरोबरची आहे. ज्याने सुवर्ण पदक जिंकलं तोही आमचा मुलगा आहे. तो खूप मेहनत करतो.'
पाकिस्तानमध्ये काय प्रतिक्रिया होत्या?
भारतामध्ये आनंद वातावरण आहे पण पाकिस्तानमध्ये नेमकं काय प्रतिक्रिया होता. तर पाकिस्तानच्या डॉन आणि जिओ टीव्हीच्या वेबसाईटवर पहिल्या तीन बातम्या या अर्शदचा आहेत. 40 वर्षांची प्रतीक्षा संपली अशा मथळच्या बातम्या आहेत. त्या बातमीमध्ये नीरजचाही उल्लेख करण्यात आलाय. सलग दुसरं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याच्या आशेने भारताच्या नीरज चोप्राने 89.45 भाला फेकला आणि रौप्य पदक जिंकलं, असं लिहिण्यात आलंय.
तर पंतप्रधान शेहबाज शरीफ म्हणाले की, 'शाब्बास अर्शद. इतिहास रचला आहे. पाकिस्तानचा पहिला पुरुष भालाफेक चॅम्पियन अर्शद नदीम पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून सुवर्णपदक घरी आणत आहे! तू संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे.'
माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणतात, 'पाकिस्तानसाठी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अर्शद नदीमचे अभिनंदन. ऍथलेटिक्समध्ये ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिकरित्या सुवर्ण जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.'
बिलावल भुट्टो झरदारी यांनी X वर पोस्ट केलंय की, 'भालाफेकमधील ऑलिम्पिक विक्रम 92.97 मीटरने मोडल्याबद्दल अर्शद नदीमचे अभिनंदन. पाकिस्तानसाठी सुवर्णपदक... तुम्ही आम्हा सर्वांना अभिमान वाटला.'
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
'नीरज चोप्रा हे उत्कृष्टतेचे मूर्त स्वरूप आहेत. त्याने वेळोवेळी आपले श्रेष्ठत्व दाखवून दिले आहे. त्याने पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये यश मिळवले याचा देशाला खूप आनंद आहे. यासह, पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले आणि सांगितले की ते असंख्य आगामी खेळाडूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि देशाला अभिमानास्पद करण्यासाठी प्रेरणा देत राहतील.'
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिक्रिया
'पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्याबद्दल नीरज चोप्रा यांचे हार्दिक अभिनंदन. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. देशाला त्याचा अभिमान आहे. त्यांचे हे यश येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल. नीरज चोप्रा भविष्यात आणखी पदके जिंकेल, अशी भारताला आशा आहे.'