Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकचा तिसरा दिवस, `या` खेळाडूकडून भारताला पदकाची अपेक्षा; पहा संपूर्ण शेड्युल
तिसऱ्या दिवशी सुद्धा पॅरालिम्पिकच्या विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू दिसतील. तेव्हा 31 ऑगस्ट रोजी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचं शेड्युल कसं असेल हे पाहुयात.
ऑलिम्पिक नंतर आता पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा भारताकडून तब्बल 84 खेळाडूंचा चमू पाठवण्यात आला असून दुसऱ्या दिवशी भारताने नेमबाजीत तीन पदक जिंकली होती. यात अवनि लेखरा हिने जिंकलेल्या सुवर्ण, मनीष नरवालच्या रौप्य आणि मोना अग्रवालच्या कांस्य पदकाचा समावेश होता. सध्या पॅरालिम्पिक भारताच्या खात्यात चार पदकांचा समावेश आहे. तिसऱ्या दिवशी सुद्धा पॅरालिम्पिकच्या विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू दिसतील. तेव्हा 31 ऑगस्ट रोजी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचं शेड्युल कसं असेल हे पाहुयात.
नेमबाजी :
पुरुष 10 मित्र एयर राइफल स्टँडिंग एसएच1 (क्वालीफिकेशन राउंड) : स्वरूप महावीर उन्हाळकर - दुपारी 1 वाजता
महिला 10 मीटर एयर पिस्टल एसएच1 (क्वालीफिकेशन राउंड) : रूबीना फ्रांसिस - दुपारी 03.30 वाजता
ट्रॅक सायकलिंग :
महिला 500 मीटर टाइम ट्रायल सी1-3 (क्वालीफिकेशन राउंड) : ज्योति गडेरिया - दुपारी 1.30 वाजता
पुरुष 1,000 मीटर टाइम ट्रायल सी1-3 (क्वालीफिकेशन राउंड) : अरशद शेख - दुपारी 1.49 वाजता
हेही वाचा : पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज अवनी लेखराला सुवर्णपदक, तर मोना अगरवालची कांस्य पदकाला गवसणी
नौकानयन :
मिक्स्ड पीआर3 डबल स्कल्स (रेपेचेज) : अनीता आणि नारायण कोंगनापल्ले – दुपारी 3 वाजता
तीरंदाजी :
महिला कंपाउंड (1/8 एलिमिनेशन 2): सरिता देवी विरुद्ध एलोनोरा सारती (इटली) – संध्याकाळी ७ वाजता
महिला कंपाउंड (1/8 एलिमिनेशन 8): सरिता देवी विरुद्ध मारियाना ज़ुनिगा (चिली) – संध्याकाळी 8.59 वाजता
एथलेटिक्स :
पुरुष भालाफेक एफ57 (मेडल इवेंट): प्रवीन कुमार – रात्री 10.30 वाजता