Paris Paralympic 2024: पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताचे खेळाडू पदकांची लयलूट करत असून आता भारताच्या खात्यातील एकूण पदकांची संख्या 27 वर पोहोचली आहे. पॅरालिम्पिक 2024 मध्ये नागालँडचे पॅरा ऍथलिट होकाटो होतोजे सेमा ( Hokato Sema) यांनी इतिहास रचला आहे. 40 वर्षीय होकाटोने शॉट पुट  F57 मध्ये कांस्य पदक पटकावले. त्याने 14.65 मीटर थ्रो करून या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. होकाटो सेमाचे हे पहिले पॅरालिम्पिक होते. यापूर्वी एशिया पॅरा गेम्स 2022 मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. 


दहशतवाद्यांशी लढताना पाय गमावला : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होकाटो होतोजे सेमा हे भारतातील नागालँड राज्यातील असून ते एक पॅरा ऍथलिट आहेत, जे शॉर्ट पुट F47 हा कॅटेगरीसाठी परफॉर्म करता. होकाटो होतोजे सेमा हे अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातून आहेत. होकाटो होतोजे सेमाने नेहमी देशसेवेसाठी स्पेशल फोर्समध्ये सहभागी होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. ते भारतीय सैन्यात दाखल सुद्धा झाले. होकाटो हे भारतीय सैन्य दलात 9 असम रेजिमेंटचे हवालदार होते.  परंतु 14 ऑक्टोबर 2002 रोजी झालेल्या एका काउंटर इन्फिल्ट्रेशन ऑपरेशन  दरम्यान ते माइन ब्लास्टचे शिकार झाले. यामध्ये त्यांना डावा पाय गमवावा लागला. मात्र यानंतरही त्याने हार मानली नाही. शॉर्ट पुट या खेळात ते एक यशस्वी ऍथलिट बनले. त्यांची कहाणी अनेकांना प्रेरणादायी ठरते. 


होकाटो होतोजे सेमाची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी : 


2016 रोजी होकाटोने 32 व्या वर्षी शॉर्ट पुट खेळायला सुरुवात केली. त्यांनी कोच राकेश रावण यांच्याकडून ट्रेनिंग घेतले. त्यावर्षी त्यांनी जयपूर येथे राष्ट्रीय पॅरा चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. सध्या त्यांना ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट नावाच्या स्पोर्ट्स एनजीओकडून मदत केली जाते. शुक्रवारी सेमाने अझरबैजानच्या ओलोखान मुसायेवचा 13.49 मीटरचा मागील पॅरालिम्पिक विक्रमही मोडला. दरम्यान, इराणच्या यासिन खोसरावीने 15.96 मीटर फेक करून सुवर्णपदक तर ब्राझीलच्या थियागो डोस सँटोसने 15.06 मीटर फेक करून रौप्यपदक पटकावले.


हेही वाचा : कोण म्हणतं रोहित शर्मा अनफिट? 'हा' Video एकदा पाहाच! Hitman ला कराल सलाम


 


भारताकडून यंदा पॅरालिम्पिकमध्ये 84 खेळाडूंचा सहभाग :


सध्याच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने 12 कांस्य, नऊ रौप्य आणि सहा सुवर्णांसह 27 पदके जिंकली आहेत. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 साठी भारताने यंदा 84 खेळाडूंचा समूह पाठवला आहे. हे खेळाडू विविध 12 स्पर्धांमध्ये भाग घेणार असून यात 52 पुरुष तर 32 महिला खेळाडूंचा समावेश आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेची सांगता 9  सप्टेंबरला होईल. अवनी लखेरा, नितेश कुमार, सुमित अंतिल, हरविंदर सिंग, धरमबीर आणि प्रवीण कुमार यांनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदके जिंकली आहेत.