Rohit Sharma Gym Video : भारताच्या वनडे आणि टेस्ट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याचा जिममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सध्या रोहित बांगलादेश विरुद्धच्या टेस्ट सिरीजपूर्वी जिममध्ये घाम गाळताना दिसतोय. कर्णधार रोहित जिममध्ये धावणे आणि टायरचा वापर करुन केला जाणारा वजन उचलण्यासंदर्भातील व्यायाम करताना दिसत असून हिटमॅनचा हा अंदाज पाहून त्याचे फॅन्स थक्क झाले आहेत. सामान्यपणे रोहित शर्माला त्याच्या वाढलेल्या पोटावरुन काहीजण डिवचताना इंटरनेटवर पाहायला मिळत असताना त्याचा हा नवा अंदाज सध्या चांगलाच चर्चेत आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेली तीन सामन्यांची वनडे सिरीज भारताने गमावली. या सिरीजमध्ये भारताचा 2-0 ने पराभव झाला होता. तेव्हा आता कर्णधार रोहित शर्माने आगामी बांगलादेश विरुद्ध सिरीज जिंकण्यासाठी कंबर कसलीये. श्रीलंके विरुद्ध भारताने वनडे सिरीज गमावली असली तरी यात रोहित शर्माने दमदार परफॉर्मन्स दिला होता. श्रीलंकेविरुद्ध 37 वर्षांच्या रोहितने 141.44 च्या स्ट्राईक रेटने 157 धावा केल्या. यात रोहितने दोन अर्धशतकं केली. रोहित शर्माची सर्वोत्तम धावसंख्या 64 इतकी होती.
19 सप्टेंबर पासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळली जाणार आहे. तेव्हा यापूर्वी रोहित स्वतःला गिअर अप करत असून जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. रोहितच्या जिम ट्रेनिंगचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात रोहित एक मोठा वजनदार टायर उचलताना दिसतोय. रोहितचे हे रूप पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला 'बाहुबली' म्हटले. रोहित जिममध्ये वेगवेगळे व्यायाम करताना दिसतोय. विराट हा त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो मात्र आता रोहितचा रफ आणि टफ अंदाज पाहून त्याचे फॅन्स इम्प्रेस झाले आहेत.
Captain Rohit Sharma during gym session.
Boss working hard for upcoming test season @ImRo45 pic.twitter.com/jmnU98YASs
— (@rushiii_12) September 7, 2024
19 सप्टेंबर पासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. 19 ते 23 सप्टेंबर पर्यंत टेस्ट सिरीजचा पहिला सामना एम चिदंबरम स्टेडियमवर रंगणार असून 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान दुसरा टेस्ट सामना उत्तर प्रदेश येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवण्यात येईल. त्यानंतर 6 आणि 9 ऑक्टोबर रोजी भारत- बांगलादेश यांच्यात टी 20 सिरीज खेळवली जाईल.
नक्की वाचा >> दुसऱ्यांचा हक्क मारला म्हणून तुला देवाने शिक्षा दिली! बृजभूषणची विनेशवर थेट टीका
बांगलादेश विरुद्ध खेळताना जर रोहित शर्माच्या बॅटमधून 2 शतक निघाले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ठोकलेल्या शतकांची संख्या ही एकूण ५० होईल. यासह तो माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या विशेष क्लबमध्ये सामील होईल.