पर्थ :  पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या इनिंगनंतर ऑस्ट्रेलियाकडे 43 रन्सची आघाडी आहे. ऑस्ट्रेलिया संघाने केलेल्या 326 रन्सचा पाठलाग करताना कॅप्टन विराट कोहलीने केलेल्या शतकाच्या जोरावर भारत 283  रन्स करु शकला. त्याला अजिंक्य राहणेने अर्धशतक करुन साथ दिली. या दोघांनी 91 रन्सची भागीदारी केली तर बाकीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलामीला आलेला मुरली विजय भोपळाही फोडू शकला नाही. त्याला मिथेल स्ट्रॅक्सने आपलं शिकार बनवलं. तर के.एल राहुल अवघ्या 2 रन्सवर हॅजलवूडच्या बॉलिंगवर आऊट झाला. चेतेश्वर पुजाराने तग धरण्याचा प्रयत्न केला. पण 103 बॉलमध्ये 24 रन्स केल्यानंतर मिेथेलच्या बॉलींगवर पेनकडे कॅच देत तो बाद झाला. नेथन लॉयनने पाच विकेट घेतले. तर मिथेल आणि हॅजलवूडला प्रत्येकी दोन विकेट मिळाले. पॅटने विराट कोहलीचा महत्त्वाचा विकेट घेतला.


कोहलीचा कहर 



 भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दमदार शतक ठोकलंय. कसोटी कारकिर्दीतलं त्याचे हे २५ वे शतक आहे. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला बाद केले. त्यानंतर कोहलीने जबाबदारीने खेळ करताना भारताच्या धावांचा वेग कायम राखला. त्याने 214 चेंडूंत शतक पूर्ण केले. या शतकासह कोहलीने सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलंय. कोहलीने १२७ डावांत २५ वे कसोटी शतक पूर्ण केले.



सर्वात जलद २५ कसोटी शतक करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. ६८ डावांत २५ शतक झळकावण्याचा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. तेंडुलकरला हा पल्ला गाठण्यासाठी 130 डाव खेळावे लागले. सचिनच्या आणखी एका विक्रमाची कोहलीने बरोबरी साधलीय. कोहलीचे हे ऑस्ट्रेलियातील सहावे कसोटी शतक ठरले. सचिनने ऑस्ट्रेलियात यजमानांविरुद्ध सहा कसोटी शतकं झळकावलीत.