IND vs AUS सीरिजपूर्वी पॅट कमिन्सचा मोठा निर्णय, क्रिकेट जगतात खळबळ; समोर आलं कारण
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने आपण दोन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले.
कर्णधार पॅट कमिन्स याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला वर्ल्ड कप 2023 मध्ये पराभूत करून हातातोंडाशी आलेली ट्रॉफी हिसकावली. भारत 2024 च्या शेवटी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. नोव्हेंबर महिन्यात 5 सामन्यांची टेस्ट सिरीजसाठी खेळण्यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. मात्र यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने आपण दोन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले.
फोक्स स्पोर्ट्सशी एका मुलाखतीत बोलताना पॅट कमिन्सने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीबाबत बोलताना म्हंटले की, "ही अशी ट्रॉफी आहे, जी आम्ही जिंकलेली नाही. आमच्या टेस्ट टीम मधील खेळाडूंनी मागील काळात मोठी कामगिरी केली आहे, आम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. पण बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकणे हे स्वप्न अजूनही अपूर्णच आहे. "
भारतीय टेस्ट टीमबद्दल बोलताना कमिन्स म्हणाला, "भारत एक चांगली टीम आहे. आम्ही त्यांच्या सोबत खूप क्रिकेट खेळलो आहोत. त्यामुळे त्यांचा खेळ सुद्धा आम्हाला माहितीये. परंतू आम्हाला असं वाटतंय की आम्ही सध्या खूप चांगलं करतोय".
हेही वाचा : Cricket : विकेट घेतल्यावर पठ्ठयाने केलं अजब सेलिब्रेशन, पहिलं केलं सेल्युट मग बूट खोलून.... Video
पॅट कमिन्सने का घेतलाय ब्रेक?
पॅट कमिन्स मागच्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर खूप व्यस्त आहे. त्याने वनडे वर्ल्ड कप 2023, आयपीएल 2024 आणि टी 20 वर्ल्ड कप 2024 इत्यादी सर्व टुर्नामेंट्स लागोपाठ खेळले आहेत. आता थकवा आणि वर्कलोडमुळे पॅट कमिन्सने 8 आठवड्यांचा ब्रेक घेतला. हा निर्णय त्याने नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीला अनुसरून घेतला आहे.
कधी होणार बॉर्डर गावसकर ट्रॉफी :
बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सिरीजचा पहिला सामना हा 22 नोव्हेंबर रोजी पर्थ येथे खेळवला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच दिवसांची टेस्ट सीरिज होईल. सीरिजची शेवटची टेस्ट मॅच ही सिडनीमध्ये होईल. 2014-15 नंतर ऑस्ट्रेलिया टीम भारताविरुद्ध अजून एकही टेस्ट सीरिज जिंकू शकलेली नाही. भारताने 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ऐतिहासिक विजय मिळवून लागोपाठ चार सीरिज जिंकल्या आहेत.