मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 38 व्या सामन्यात  पंजाब किंग्सने (Punjab Kings) चेन्नई सुपर किंग्सवर (CSK) 11 धावांनी विजय मिळवला. शिखर धवन पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला. शिखरने 59 बॉलमध्ये 9 फोर आणि 2 सिक्ससह 88 धावांनी नाबाद खेळी केली. धवनने यासह चेन्नई विरुद्ध 1 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठकला. तसेच शिखरने मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माचा (Rohit Sharma) मोठा रेकॉर्डब्रेक केला. (pbks vs csk ipl 2022 shikhar dawan break rohit sharma record and become 1st batsman who scored most runs against single team in history)


रोहितचा रेकॉर्ड ब्रेक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखरने रोहितचा आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही एका टीम विरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम मोडित काढला. रोहितने आतापर्यंत कोलकाता विरुद्ध 1 हजार 18 धावा केल्या आहेत.


तर शिखरने चेन्नई विरुद्ध आता 1 हजार 29 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये एका टीम विरुद्ध सर्वाधिक धावांच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानी आहे. वॉर्नरने पंजाब विरुद्ध 1 हजार 5 धावा केल्या आहेत.