PBKS vs MI, IPL 2024 : मुंबई अन् पंजाब तिसऱ्या विजयासाठी सज्ज, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
MI vs PBKS, Head To Head Record: आयपीएल 2024 स्पर्धेत आज करो या मरोची स्थिती असणार आहे. पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्स सामना रंगणार आहे. आजा हा सामना कसा असेल? दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी काय असेल ते जाणून घ्या...
Mumbai Indians vs Punjab Kings Head To Head Record: आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 33 वा आज (18 एप्रिल) सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात रंगणार आहे. हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या दोन्ही संघांता तिसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. एकंदरित आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचा ठरणार आहे.
आयपीएलच्या गुणतालिकेत 4 गुण आणि -0.218 नेट रन रेटसह पंजाबचा संघ सातव्या स्थानावर आहे, तर 4 आणि -0.234 नेट रन रेटसह मुंबई संघ आठव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी 8 पैकी 6 सामने जिंकायचे आहेत. त्यामुळे हा सामना ठरणार आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज 31 वेळा आमनेसामने आले आहेत. पंजाब किंग्सने 15 वेळा तर मुंबई इंडियन्सने 16 वेळा बाजी मारली आहे. पंजाबचा संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळेल, याचा फायदा मिळू शकतो. पंजाबची मुंबई इंडियन्सविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या 230 आहे, तर पंजाबनेही मुंबईविरुद्ध 223 धावांची सर्वोच्च धावसंख्या केली आहे.
महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या मोसमात आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये दोनदा संघांनी लक्ष्याचा पाठलाग करून विजय मिळवला, तर एकदा सनरायझर्स हैदराबादने धावसंख्येचा बचाव करून सामना जिंकला. एसआरएचने केवळ 2 धावांनी हा विजय नोंदवला. या जमिनीवर दव चा फारसा परिणाम होत नाही. मात्र, मागील सामन्यातील विक्रम लक्षात घेता येथे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घ्यायचा आहे. या मैदानावर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व आहे.
पंजाब किंग्ज
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम करन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल.
मुंबई इंडियन्स
इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), मोहम्मद नबी, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.