दुबई : 'पेप्सिको'च्या अध्यक्ष आणि सीईओ इंद्रा नूयी यांची 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'ची पहिली महिला स्वतंत्र महिला संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नूयी जून २०१८ मध्ये बोर्डात कार्यरत होतील. 'या भूमिकेसाठी आयसीसीशी जोडली जाणारी पहिली महिला बनल्यामुळे मी खूपच उत्साही आहे. बोर्ड, आयसीसी भागीदार आणि क्रिकेटर्ससोबत काम करण्यास मी उत्सुक आहे' असं नूयी यांनी म्हटलंय. सोबतच, क्रिकेट माझी आवड आहे. मी कॉलेजमध्ये असताना क्रिकेट खेळलेय. हा खेळ टीमवर्क, सन्मान आणि एक चांगलं आव्हान देण्याची शिकवण देतो, असंही त्यांनी म्हटलंय. 


तर, आणखी एक स्वतंत्र संचालक आणि तीही एक महिला... देशाच्या संचालनाला आणखी पुढे नेण्याच्या दिशेत हे एक महत्त्वाचं पाऊल आहे, नूयी यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात आलीय... परंतु, त्यांना दुसरीही संधी दिली जाऊ शकते... त्या सलग सहा वर्षांपर्यंत या पदावर राहू शकतील, असं आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी म्हटलंय. 


नूयी या जगातील सर्वात प्रतिभावान महिलांपैंकी एक मानलं जातं. स्वतंत्र महिला संचालकपदासाठी गेल्या वर्षी जून महिन्यात आयसीसीनं स्वीकृती दिली होती.