धोनीनंतर विराटनंही लूक बदलला!
सीरिज किंवा मॅचच्या आधी भारतीय टीमचे खेळाडू नेहमीच लूक बदलतात.
मुंबई : सीरिज किंवा मॅचच्या आधी भारतीय टीमचे खेळाडू नेहमीच लूक बदलतात. वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे सीरिज सुरू होण्याआधी महेंद्रसिंग धोनीनं त्याचा लूक बदलला. धोनी मैदानात येण्याच्या आधीच त्याचा फ्रेंच कट असलेल्या दाढीचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला. धोनीनंतर आता भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीही नव्या लूकसह मैदानात उतरणार आहे.
प्रसिद्ध हेयरस्टायलिस्ट आलिम हकीमनं विराटला हा नवा लूक दिला आहे. आलिमनं विराटबरोबरचा नव्या लूकचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. पहिल्यांदा विराटचा फोटो शेअर करताना हकीमनं फिल्टरचा वापर केला आहे. हा फोटो एडिट करून हकीमनं विराटच्या चेहऱ्याच्याऐवजी मांजरीचा चेहरा लावला आहे. तसंच ओळखलंत का कोण आहे, असा प्रश्नही त्यानं विचारला.
पहिल्या फोटोच्या काही वेळानंतर आलिमनं विराटचा दुसरा फोटो शेअर केला. किंग विराट कोहली विशाखापट्टणममध्ये नव्या हेअरकटसह. असं कॅप्शन आलिम हकीमनं विराटच्या या फोटोला दिलं आहे.
गुवाहाटीमधली पहिली वनडे जिंकल्यानंतर आता २४ ऑक्टोबरला विशाखापट्टणममध्ये दुसरी वनडे खेळवण्यात येणार आहे. पहिल्या वनडेमध्ये विराट आणि रोहितच्या शतकामुळे भारतानं ही मॅच अगदी सहज जिंकली. ३२३ रनचा पाठलाग करताना भारतानं ८ विकेटनं दणदणीत विजय मिळवला आणि ५ वनडेच्या या सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतली.
धोनीचा नवा लूक