शारजाह : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ 14 पैकी 10 सामने जिंकून लीगमध्ये टेबल टॉपवर राहिला, पण संघात बहुतेक तरुण खेळाडू आहेत, ज्यांना मोठ्या सामन्यांमध्ये खेळण्याचा अनुभव नाही. आता क्वालिफायरमध्ये दिल्लीच्या संघाला कोलकाताकडून तीन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आहे, ज्यामुळे त्यांना सलग दोन पराभवानंतर अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. तत्पूर्वी, दिल्लीला चेन्नईकडून चार गडी राखून पराभवाला सामोरे जावे लागले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर. अश्विन


आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अश्विन सहाव्या स्थानावर आहे. त्याने आयपीएलमध्ये 145 विकेट्स घेतल्या आहेत. तो सर्वात अनुभवी गोलंदाज होता, त्यामुळे ऋषभ पंतने त्याला शेवटची औव्हर दिली. ज्यामध्ये त्याला 7 धावा वाचवायच्या होत्या पण त्यात तो अपयशी ठरला. राहुल त्रिपाठीने पहिल्याच चेंडूवर 1 रन काढला. दुसऱ्या चेंडूवर एकही रन आला नाही. तिसऱ्या चेंडूवर शाकिब अल हसन बाद झाला. चौथ्या चेंडूवर त्याने सुनील नारायणला अक्षर पटेलच्या हाती झेलबाद केले. तो सामना दिल्लीकडे वळवेल असे वाटत होते, तो त्याच्या हॅटट्रिक चेंडूवर होता. शेवटच्या 2 चेंडूत 6 धावांची गरज होती. अश्विनच्या गोलंदाजीवर दिल्लीच्या चाहत्यांचा विश्वास होता. पण पाचव्या चेंडूवर राहुल त्रिपाठीने सिक्स मारुन कोलकाताला विजयी केले. पाचव चेंडू अश्विनने बाहेरच्या दिशेने फेकला जो अतिशय संथ होता. त्यामुळे सिक्स मारताना त्रिपाठीला अडचण आली नाही, दिल्लीला अशा अनुभवी गोलंदाजाकडून अशा बॉलची अपेक्षा नव्हती.


शिखर धवन


दिल्लीला शिखर धवनकडून कोलकाताविरुद्ध तुफानी फलंदाजी करण्याची अपेक्षा केली होती, पण त्याने खोडा पहाड निकला चुहि अशी कामगिरी केली. धवनने 39 चेंडूत फक्त 36 धावा केल्या. त्याने अतिशय संथ फलंदाजी केली. फिरकीपटू वरुणच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. साकिब अल हसनला साधा झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.


अक्षर पटेल


अक्षर पटेलला भारतीय संघाच्या 15 जणांच्या संघातून वगळण्यात आले, त्याच्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आला. त्याची अलीकडची कामगिरी बघता. हा निर्णय योग्य असल्याचे दिसून येते. कोलकात्याविरुद्ध त्याची कामगिरी निराशाजनक होती. व्यंकटेश अय्यरने त्याच्या बॉलवर अनेक षटकार ठोकले. तो महागडा गोलंदाज असल्याचे सिद्ध झाले. त्याने 4 ओव्हरमध्ये 32 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. त्याच्या बॉलिंगवर कोलकात्याच्या फलंदाजांनी मुक्तपणे धावा केल्या. अक्षर फलंदाजीमध्येही फारसे योगदान देऊ शकला नाही. 4 चेंडूत फक्त 4 धावा करू शकला.