मुंबई : हैदराबादच्या विरुद्ध ख्रिस गेलने तुफान खेळी करत शतक ठोकलं. 63 बॉलमध्ये त्याने 104 रन करत हैदराबादपुढे मोठं लक्ष्य ठेवलं. पंजाबच्या विजयाचा तो शिल्पकार ठरला. गेलच्या या तुफानी खेळीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. सामना संपल्यानंतर गेलने म्हटलं की, मी ज्या फ्रेंचायजीसाठी खेळतोय त्याच्यासाठी 100 टक्का देऊ इच्छितो. कारण अनेक लोकं म्हणतात की गेलला अजून खूप काही सिद्ध करायचं आहे. 


गेलचा खुलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिलावात सुरुवातीला गेलला कोणीच विकत घेतलं नव्हतं. त्यावर बोलताना गेलने म्हटलं की, 'मला वाटतं की, सेहवागने माझी निवड करत लीगमध्ये रोमांच कायम ठेवला. ही चांगली सुरुवात आहे. सेहवागने एका इंटरव्यूमध्ये म्हटलं होतं की, मी जर त्यांना 2 सामने जरी जिंकवलं तरी पैसे वसूल होऊन जातील.'


गेलंचं 21 वं शतक


गेलने हैदराबाद विरुद्ध शानदार खेळी करत टी20 क्रिकेटमध्यं आपलं 21 वं शतक पूर्ण केलं. गेलनंतर शतक ठोकण्याच्या क्रमवारीत मॅक्कुलमचा नंबर लागतो. त्याच्या नावावर 7 शतकं आहेत. यामुळं शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत तो खूपच पुढे आहे. जगातील एक शानदार बॉलर राशिद खानला त्याने लगातार 4 सिक्स मारले. दुसऱ्यांदा त्याने एका ओव्हरमध्ये 4 सिक्स ठोकले आहेत. 2016 वर्ल्ड टी20 मध्ये एबी डीविलियर्सने हा कारनामा केला होता.


गेलचा कारनामा


गेलचा 14 रनवर कॅच देखील सूटला. ज्याचा परिणाम हैदराबादला भोगावा लागला. त्याच ओव्हरमध्ये गेलने राशिद खानला 2 सिक्स मारले. पहिल्यांदा राशिदने टी20 मध्ये इतके रन दिले. गेलने सामन्यात 11 सिक्स आणि 1 फोर मारला. करुण नायरने 21 बॉलमध्ये 31, फिंचने 6 बॉलमध्ये 14 रन केले.