VIDEO `अरे! तू तर ते आणलंच नाही...` पंतप्रधान मोदींनी कोणत्या खेळाडूला करुन दिली आठवण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकला जाणाऱ्या टीमसोबत संवाद साधला. त्यावेळी एका खेळाडूला एका गोष्टीची आठवण करुन दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी दिल्लीत टी-20 वर्ल्डकप वर (T20 World Cup) नाव कोरणाऱ्या भारतीय टीमशी संवाद साधला. त्यानंतर शुक्रवारी मोदींनी पॅरिस ऑलिम्पिकला (Paris Olympics 2024) जाणाऱ्या टीमसोबत बातचीत केली. यावेळी भालाफेक चॅम्पियन नीरज चोप्राशी बोलताना पंतप्रधान मोदी फूल मस्तीच्या मूडमध्ये होते. नीरज चोप्राने, हॅलो सर, तुम्ही कसे आहात? असा प्रश्न विचारल्यानंतर मोदींनी त्याला एका गोष्टीची आठवण करुन दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी तोच आहे. पण अरे! तू तर चुरमा आणलायच नाही. हे ऐकताच नीरज लाजला आणि म्हणाला की, सर, मी नक्की आणेल. मागच्या वेळी दिल्लीत साखरेचा चुरमा होता. हरियाणामधील चुरमा तुम्हाला खाऊ घालेल. त्यावर मोदी म्हणाले की, मला तुझ्या आईच्या हातचा चुरमा खायचा आहे. यावर नीरजने त्यांना नक्कीच म्हणत आश्वासन दिलं.
नीरज चोप्राने पंतप्रधानांना दिलेले होते वचन
खरं तर ही चुरमाचा किस्सा 4 वर्षांपूर्वीचा आहे. ज्याची आठवण मोदींनी करुन दिली. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांसह मोदींनी नाश्ता केला होता. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये नीरजने गोल्ड मेडल पटकवलं होतं. त्यावेळी दिल्लीतील मोदींसोबतच्या नाश्तात खेळाडूंनी चुरमा खाल्ला होता.
त्यावेळी मोदी नीरजला म्हणाले होते, हा चुरमा तुला खूप त्रास देणार आहे. त्यावर नीरजने मोदींना त्याच्या घरचा चुरमा खायला देणार असं वचन दिलं होतं. नीरज कदाचित हे वचन विसरला पण मोदींनी ही गोष्ट लक्षात ठेवली.