राजस्थानचा विजयी `सिक्सर`, 39 सामन्यांनंतर पाहा पॉईंट टेबलचं समीकरण
के एल राहुलला मोठा धक्का, राजस्थान टॉपवर तर कोलकाताची घसरगुंडी कायम
मुंबई : आयपीएलमध्ये 39 वा सामना बंगळुरू विरुद्ध राजस्थान झाला. या सामन्यात राजस्थाननं बंगळुरूचा 29 धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर पॉईंट टेबलची गणितं बदलली आहेत. आयपीएल सुरू होऊन जवळपास एक महिना झाला. या महिन्याभरात पॉईंट टेबलमध्ये मोठा फरक जाणवत आहे.
आयपीएलमध्ये मुंबई टीम तर प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. आता चेन्नई देखील त्याच मार्गावर आहे. पहिले सामने जिंकून कोलकाता टीम टॉपवर राहिली होती. मात्र आता सामने गमावल्याने त्यांना मोठं नुकसान झालं आहे. Point Table मध्ये कोलकाता आठव्या स्थानावर आहे.
सातव्या स्थानावर दिल्ली तर सहाव्या क्रमांकावर पंजाब टीम आहे. पंजाबने 8 पैकी 4 सामने जिंकले तर 4 गमवले आहेत. पाचव्या स्थानावर बंगळुरू टीम आहे. बंगळुरूने 9 पैकी 5 सामने जिंकले तर 4 गमावले आहेत.
8 पैकी 5 सामने जिंकून चौथ्या स्थानावर लखनऊ टीम आहे. तर तिसऱ्या स्थानावर हैदराबाद टीम आहे. हैदराबाद शेवटून तिसऱ्या स्थानावर होती. मात्र त्यांनी दणक्यात कमबॅक केलं. आता हैदराबाद टीम टॉप 3 मध्ये आहे.
पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर गुजरात टीम आहे. 7 पैकी 6 सामने जिंकून गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे. यंदाच्या हंगामातील सर्वात यशस्वी टीम म्हणून पाहिलं जातं. पहिल्या नंबरवर राजस्थान टीम आहे. गेल्या हंगामात राजस्थान टीम प्ले ऑफमधून बाहेर गेली होती. मात्र यंदा राजस्थान टीम प्ले ऑफसाठी पोहोचण्याच्या स्पर्धेत इतर टीमला कडवी टक्कर देताना दिसत आहे.