नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील युवकांना भडकावण्याचं काम पाकिस्तानकडून सुरु असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. अता पुन्हा असाच एक प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरमधील एका लोकल क्रिकेट टूर्नामेंटमध्ये भारताचं राष्ट्रगीत म्हणण्याऐवजी पाकिस्तानचे राष्ट्रगीत म्हटल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्थानिक क्रिकेट टूर्नामेंटमध्ये खेळाडूंनी पाकिस्तानचं राष्ट्रगीत म्हटल्याचं दिसत आहे. 


एरिन गावात आयोजित मॅचपूर्वी पाकिस्तानचं राष्ट्रगीत सुरु आहे आणि चार खेळाडू उभे असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत चार क्रिकेट खेळाडूंना अटक केली आहे. 


पोलिसांनी सांगितलं की, या मॅचचं आयोजन करणाऱ्यांचा आम्ही शोध घेत आहोत. २०१६ मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये स्थानिक क्रिकेट खेळाडूंनी मॅचपूर्वी पाकिस्तानच्या राष्ट्रगीतावर सलामी देताना पहायला मिळालं होतं.


पोलिसांनी काही खेळाडूंना अटक केलं मात्र, अशी चूक पुन्हा होणार नाही असं आश्वासन त्यांच्या कुटुंबियांकडून मिळाल्यानंतर या खेळाडू्ंची सुटका करण्यात आली होती. REAL KASHMIR NEWS नावाच्या फेसबूक पेजवर यासंदर्भातील बातमी शेअर करण्यात आली आहे.