Prabhsimran Singh IPL Century: पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात झालेल्या सामन्यात प्रभसिमरन सिंह (Prabhsimran Singh) याने एकांगी वादळी शतक ठोकलं. पंजाबच्या विजयात प्रभसिमरन खऱ्या अर्थाने पंजाबसाठी नायक ठरलाय. पंजाबचे फलंदाज एकामागून एक बाद होत होते. तिथे प्रभसिमरन सिंगने शतक झळकावत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. त्याच्या या शतकीय खेळीमुळे दिल्लीला 31 धावांनी पाणी पाजता आलं. शकत झळकावल्यानंतर प्रभसिमरन सिंह याच्या नावाची चर्चा झाली. मात्र, तुम्हाला माहितीये का? याच प्रभसिमरनसाठी खुद्द क्रिकेटचा देव (Sachin Tendulkar) धावून आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षभरापूर्वी आयपीएलमध्ये (IPL 2023) कमी संधी मिळाल्याने प्रभसिमरन निराश झाला होता, मात्र अनुभवी खेळाडू सचिन तेंडुलकरच्या सल्ल्याने त्याची कारकीर्द बदलली आणि त्यानंतर त्याने 17 सिक्स ठोकत शतक झळकावले. त्यानंतर इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने यशाचं गुपित सांगितलं आहे.


काय म्हणाला प्रभसिमरन?


टीम कॉम्बिनेशनमुळे मला आयपीएल 2022 मध्ये संधी मिळत नव्हती, पण मला खेळायचे होते. आमचा मुंबई इंडियन्स विरुद्ध सामना होता आणि मी थेट सचिन सरांकडे गेलो. सर, मी अस्वस्थ होतोय आणि निराशा वाढत आहे, असं मी सांगितलं, त्यावेळी त्यांनी मला मोलाचा सल्ला दिला.


सचिनने काय सल्ला दिला?


तू मेहनत करून इथपर्यंत पोहोचलाय. अजूनही देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेहनत घेतोय आणि कोणत्याही संघात नाहीत त्यांचा विचार कर. या वेळेचा आनंद घे आणि कठोर परिश्रम कर आणि सामन्याच्या परिस्थितीनुसार सराव कर. तुझ्या खेळात सुधारणा करत राहा. संधी मिळेल तेव्हाच चांगली कामगिरी करावी असं नाही. खेळाडू म्हणून काम कठोर परिश्रम करणं आणि बाकीचं काम नशिबावर सोडणं, हाच एक मार्ग असतो, असं सचिनने (Sachin Tendulkar to Prabhsimran Singh) सांगितलं होतं.


आणखी वाचा  - T20 World Cup साठी कोण असेल कॅप्टन? Ravi Shastri यांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले...


दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या सल्ल्यामुळे प्रभसिरमन सिंह पुन्हा नव्या जोशात खेळू लागला. मुश्ताक अली ट्रॉफी आणि  फर्स्ट क्लास टूर्नामेंट रणजी ट्रॉफीमध्ये प्रभसिमरनने पुन्हा जोमानं मैदान गाजवलं. त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही. आयपीएलमध्ये त्याने शतक ठोकल्यानंतर खुद्द डेविड वॉर्नरने देखील प्रभसिमरन सिंह याचं कौतूक केलंय.