Hardik Natasa Divorce News: गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पंड्या यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान सोशल मीडियावर दोघांच्याही नात्याबाबत अनेक विचित्र अफवाही उठू लागल्या आहेत. मात्र दोघांनीही अजून अधिकृतपणे यावर भाष्य केलेलं नाही. अशातच नताशाने इन्स्टाग्रामवर एक सूचक पोस्ट केली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, हे पाहूयात.


नताशाची इन्स्टाग्राम स्टोरी झाली व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नताशाने इंस्टाग्रामवर एक सूचक स्टोरी शेअर केली होती. नताशाने अपडेट केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये ती वांद्रे-वरळी सी-लिंकवरून कारमधून प्रवास करत असल्याचं दिसून येतंय. याशिवाय तिने कॅप्शनमध्ये असंही लिहिलंय की, देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवण्याबद्दल नताशाला नेमकं काय म्हणायचं आहे समजणे कठीण आहे.


ट्रॅफिक साईनची स्टोरीही झाली होती व्हायरल


काही दिवसांपूर्वी नताशाने आणखी एक गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ज्यामध्ये तिने ट्रॅफिकचे साईन दाखवले होते आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते, "कोणीतरी लवकरच रस्त्यावर येणार आहे." हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकच्या जवळच्या मित्राच्या दाव्यानुसार, दोघेही अनेक महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. नताशाने हार्दिकचे घर सोडलं आहे. ( झी 24 तास या दाव्याची खातरजमा करत नाही )


घटस्फोटाच्या प्रश्नावर काय म्हणाला होती नताशा?


घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्यावर अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅनकोविक एका व्यक्तीसोबत स्पॉट झाली होती. हा व्यक्ती दिशा पटानीचा कथित बॉयफ्रेंड अलेक्झांडर ॲलेक्स इलिक असल्याचं म्हटलं गेलं. तो एका रेस्टॉरंटमध्ये दिसला होता. दरम्यान दोघांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता. यावेळी एका पत्रकाराने तिला घटस्फोटाच्या अफवांवर प्रश्न विचारला, यावर ती स्पष्टपणे काहीही बोलली नाही. Thank You so much असं म्हणून ती तिथून पुढे निघून गेली.


एका रिपोर्टमध्ये नताशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पांड्या आडनाव हटवल्याचा दावा करण्यात आला आहे. याआधी नताशा इन्स्टाग्रामवर आपलं नाव नताशा स्टेनकोविक पांड्या असं लावत होती. पण तिने आता पांड्या आडनाव काढून टाकलं आहे. या पोस्टनंतरच हार्दिक आणि नताशाच्या घस्फोटाची चर्चा सुरु झाली.