First Women Maharashtra Kesari : पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धाचा थरार सांगलीत (Sangali News) रंगली. सांगलीची प्रतीक्षा बागडी (Pratiksha Bagdi) आणि कल्याणची वैष्णवी पाटील (Vaishnavi Patil) या दोघांच्या मध्ये ही लढत पार पडली. या अंतिम सामन्यात प्रतीक्षा बागडेने वैष्णवी पाटीलला चितपट करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे. (Maharastra Kesari 2023 Pratiksha Bagadene become first Female Maharashtra Kesari)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकविणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील होतं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद याच्या वतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. हलगीच्या निनादात मैदानातून चांदीच्या गदाची फेरी काढण्यात आली. काही वेळेपूर्वी मैदानात चांदीचे गदा आणि महाराष्ट्र केसरी बहुमानाचा किताब दाखल झाला आहे. हलगीच्या निनादात मैदानातून चांदीच्या गदाची फेरी काढण्यात आली. त्यानंतर रंगतदार सामन्याला सुरूवात झाली.



फायनलचा थरारक सामना


प्रतीक्षा आणि वैष्णवीमध्ये झालेला अंतिम सामना थरारक राहिला. वैष्णवी पाटीलने सगल 4 गुण मिळवले. मात्र, पुढच्याच डावात प्रतीक्षाने वैष्णवीला चितपट करत सामना संपवला आणि मानाची चांदीची गदा उचलली.


आणखी वाचा - Maharashtra Kesari 2023 : सिकंदर शेखवर अन्याय म्हणता मग किरण भगतचा व्हिडीओ पाहाच


कोण आहे प्रतीक्षा बागडी?


मुळची सांगलीच्या तुंग गावची असलेली प्रतीक्षा बागडीने सांगलीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. 21 वर्षांच्या प्रतीक्षाने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं देखील पटकावली आहेत. त्याचबरोबर खेलो इंडिया कार्यक्रमात प्रतीक्षाने रौप्यपदकाची कमाई केली होती. त्याचबरोबर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये देखील तिने रौप्य कामगिरी केली होती.