Syed Mushtaq Ali Trophy, Prithvi Shaw :  मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) दमदार फॉर्मामध्ये आहे. मंगळवारी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर यशस्वी जैस्वालनेही शानदार खेळ करत आपल्या संघाला मुंबईला राजस्थानविरुद्ध विजय मिळवून दिला. या विजयासह मुंबईने या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतही स्थान निश्चित केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वी आणि यशस्वी यांची कामगिरी


पृथ्वी शॉने (Prithvi Shaw)  आक्रमक पद्धतीने फलंदाजी केली असून त्याने सामन्यात 17 चेंडूत 32 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 188.24 होता. पृथ्वीच्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. त्याचवेळी, यशस्वी जैस्वालने 27 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 46 धावा केल्या. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या या गटाच्या सामन्यात मुंबईने 6 बाद 159 धावा केल्या. त्यानंतर राजस्थानला सात गड्यांच्या मोबदल्यात केवळ 139 धावाच करता आल्या.


राहुल चहरने दोन गडी बाद केले
 
गेल्या वर्षी पृथ्वी शॉ श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाच्या (team India) जर्सीमध्ये खेळताना दिसला होता. त्यानंतर ते आतापर्यंत भारतासाठी पाच कसोटी, 6 वनडे आणि एक टी-20 सामना खेळला आहे. या गट-अ सामन्यात मुंबईकडून सरफराज खानने (Sarfaraz Khan) 37 आणि शिवम दुबेने 26 धावा केल्या आणि फलंदाजीत चांगले योगदान दिले.


राजस्थानसाठी स्पिनर राहूल चाहर (Rahul Chahar) याने गोलंदबाजीत उत्कृष्ठ कामगिरी दाखवली. त्याने 18 धावांत दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाला 47 धावांत चार गडी गमावून पुन्हा वेग मिळवता आला नाही. मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने चार षटकांत १२ धावा देत दोन गडी बाद केले. मोहित अवस्थीने 29 धावांत दोन गडी बाद केले.


वाचा : दिवाळीच्या तोंडावर पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला सामोरं जावे लागणार का? जाणून घ्या आजचे दर 


उत्तराखंडचा पराभव


मुंबईचे (Mumbai) पाच सामन्यांतून 20 गुण झाले असून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याची खात्री आहे. ग्रुप स्टेजमध्ये संघाला अजून दोन सामने खेळायचे आहेत. इतर गटातील लढतींमध्ये आसामचा आठ गडी राखून पराभव केला. त्याचवेळी मध्य प्रदेशने मिझोरामचा सहा गडी राखून पराभव केला. चुरशीच्या लढतीत विदर्भाने उत्कंठावर्धक पद्धतीने उत्तराखंडचा दोन धावांनी पराभव केला.