नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या टेस्ट मॅचसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. या टीममध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबईचा युवा ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ आणि आंध्र प्रदेशचा मधल्या फळीतला बॅट्समन हनुमा विहारीची भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. ओपनर मुरली विजय आणि स्पिनर कुलदीप यादवला डच्चू देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन्ही मॅचमध्ये मुरली विजयची कामगिरी खराब झाली. दुसऱ्या टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये विजय शून्यवर आऊट झाला. यानंतर तिसऱ्या टेस्ट मॅचमधून विजयला डच्चू देण्यात आला. आता विजयऐवजी पृथ्वी शॉचा टीममध्ये समावेश झाला आहे. तर इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या स्पिनरसाठी फारशा अनुकूल नसल्यामुळे कुलदीप यादवऐवजी निवड समितीनं हनुमा विहारीच्या रुपात जादा बॅट्समन टीममध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वात भारतानं अंडर १९ वर्ल्ड कप जिंकला होता. तसंच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही शॉनं उल्लेखनीय कामगिरी केली. याचा फायदा त्याला झाला आहे.


लागोपाठ दोन टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा २०३ रनन विजय झाला. चौथी टेस्ट मॅच ३० ऑगस्टपासून सुरु होणार आहे.


शेवटच्या २ टेस्टसाठी भारतीय टीम


विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, आर.अश्विन, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, हनुमा विहारी