Suryakumar Yadav chats virat kohli : भारतीय टीमचा फलंदाज मिस्टर 360 डिग्री म्हणजेच सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने 2023 वर्षाची उत्तम पद्धतीने सुरुवात केली आहे. श्रीलंकेविरूद्धच्या (IND vs SL) तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 112 रन्सची तुफान खेळी केली. टी-20 फॉर्मेटमध्ये पहिलं शतक (Suryakumar Yadav first century) झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. दरम्यान या सर्वांमध्ये तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर सोशल मीडियावर विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्या यांचं प्रायव्हेट चॅट व्हायरल झालं आहे. ज्यामध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांशी बोलताना दिसतायत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 112 रन्स करत सेंच्युरी केली. त्याने या खेळीमध्ये 51 बॉल्समध्ये 7 फोर आणि 9 सिक्सच्या मदतीने 219.61 च्या स्ट्राईक रेटने 112 रन्स केले. ज्यानंतर सूर्यकुमारचं सर्व स्तरावरून कौतुक होत असून त्याला शुभेच्छाही मिळत होत्या. यामध्ये टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली देखील मागे राहिला नाही. याबाबत बीसीसीआने सूर्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.  


विराट-सूर्याचं प्रायव्हेट चॅट लीक 


बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सूर्या चाहत्यांना भेटून पव्हेलियनमध्ये परतताना दिसतोय. ज्यामध्ये हार्दिक पंड्यासोबत अनेक खेळाडू त्याला शुभेच्छा देताना दिसतायत. अशामध्येच सूर्या हसत हसत फोन बघताना दिसतोय. यावेळी तो विराटने त्याला दिलेल्या शुभेच्छा पाहून खूश होतो. 



विराटने सूर्याला शुभेच्छा देताना, त्याच्या फोटोसोबत फायर इमोजी आणि सोबत हात जोडणारे इमोजी पोस्ट केलेत. त्याच्या या फोटोला रिप्लाय देताना सूर्याने लिहितो, भरपूर प्रेम ब्रो...! या मेसेजमध्ये सूर्याने विराटला हार्टचा इमोजी देखील पाठवला आहे. त्या दोघांचे हेच चॅट लीक झाले असून चाहत्यांना मात्र ते खूपच आवडले आहेत.



सूर्याने श्रीलंकेविरूद्ध शतकी खेळी करून अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 


  • 2023 या टी -20 वर्षातलं पहिलं शतक

  • सूर्यकुमारने (surykumar yadav) 43 सामन्यात 14 अर्धशतक आणि 3 शतक ठोकले आहे.

  • सूर्यकूमारने टी20 त1500 धावा पूर्ण केल्या आहेत. 834 बॉलमध्ये त्याने या धावा पुर्ण केल्या आहेत.आतापर्यंत या सर्वात वेगवान धावा असल्याचा अंदाज आहे. 

  • सूर्यकुमार यादवने (surykumar yadav) टी20 त तिसरे शतक ठोकले आहे. हे शतक ठोकून त्याने के एल राहूलचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

  • टी20 फॉरमॅटमध्ये तिसरे शतक